অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

म्हातारपणी श्रवणशक्ती कमी झाली की स्मरणशक्ती कमी होते.

म्हातारपणी श्रवणशक्ती कमी झाली की स्मरणशक्ती कमी होते.

म्हातारपणी श्रवणशक्ती कमी झाली की स्मरणशक्ती कमी होते.


बरोबर – म्हातारपणी वाढत्या वयाबरोबर एक एक शारीरिक ताकदी कमी कमी व्हायला लागतात तशी स्मरणशक्तीही कमी होत जाते, त्यातून स्मृतीभ्रंश, अल्झायमर असे रोग बळावण्याची शक्यता वाढते.
तरूणपणी कष्ट करायला मागे न राहाणार्‍या व्यक्ती म्हातारपण आलं की मागे मागे राहायला लागतात.
शरीराला काही इजा झाली, आजारपण आले तर पुन्हा तन्दुरुस्त व्हायला पूर्वीपेक्षा अधिक कालावधी लागायला लागतो.


एखादी गोष्ट समजून यायला वेळ लागतो.
हालचाली मंदावतात, दृष्टी मंदावते, ऐकायला कमी येते अशा अनेक गोष्टी नको असतील तरी होतात.
दोषदुरुस्तीसाठी - आजारावर उपचार करून घेणे, चष्मा लावणे जितके सरसकट झाले आहे त्यामानाने श्रवणयंत्र वापरून ऐकण्यातला दोष दुरुस्त करणे तितके सरसकट झालेले नाही. 1997 पासून 2013 पर्यंत अमेरीकेतील - हेल्थ ए बी सी स्टडी-चे डॉ. फ्रँक्लीन आणि त्याच्या सहकार्यांनी पिटस्-बर्ग आणि मेंफीस येथे 1984 वृद्धांचा अभ्यास केला, त्यांच्या - मानसिक आणि अंकिय - परीक्षा नियमितपणे घेतल्या, त्या परीक्षांची नोंद पद्धतशीरपणे ठेवली. 2002 पासून या वृद्धांच्या श्रवणशक्तीची मोजणीही चालू ठेवली. डॉ. फ्रँक्लीन यांना असे आढळले की – श्रवणशक्ती कमी झालेल्या वृद्धांची स्मरणशक्तीही त्या प्रमाणात कमी झाली.
एक म्हणजे - ऐकू येईनासे झाले की त्या व्यक्तीचे लोकांमध्ये मिसळण्याचे प्रमाण कमी होत जाते. इतरांशी संवाद होत असताना आपल्या स्मरणशक्तीला सतत चालना मिळत असते, ती थांबते.
दुसरे म्हणजे – शरीरातील ऊर्जा ‘ऐकणे’ या कामी अधिक खर्च करावी लागल्याने अन्य शारीरिक कृतींना कमी उरते. त्यातून मंदपणा आणि विस्मरण वाढायला लागते. शरीरात स्मृतीभ्रंश, अल्झायमर असे रोग बळावण्याची शक्यता वाढते.

ध्वनिप्रदूषणामुळे किंवा इअरफोनचा वारेमाप उपयोग केल्यामुळे श्रवणदोष निर्माण झालेल्यांनाही शरीरातील ऊर्जा ‘ऐकणे’ या कामी अधिक खर्च करावी लागत असेल तर त्यांनाही स्मृतीभ्रंश, अल्झायमर होण्याचा धोका नाकारता येणार नाही.

 

 

स्त्रोत :

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग

 

लिंक : http://mavipapunevibhag.blogspot.in/

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate