অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत शिष्यवृत्ती

< pan>सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध देशांतर्गत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेची माहिती पुढीलप्रमाणे.

योजनेचा उद्देश

एकविसाव्या शतकामध्ये यशस्वी होण्यास अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची स्पर्धात्मक युगामध्ये जडणघडण व्हावी. यासाठी देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

प्रवर्ग

अनुसूचित जाती

योजनेच्या प्रमुख अटी

  • विद्यार्थी अनुसूचित जाती/नवबौद्ध व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थ्याच्या पालकांचे सर्व मार्गांनी वार्षिक उत्पन्न 6 लाख रूपयांपर्यंत असावे.
  • या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या संस्थेत प्रवेशित असावा.

लाभाचे स्वरुप

संस्थेचे आकारणी केलेले शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व भोजन शुल्क, क्रमिक पुस्तके व शैक्षणिक साहित्य यांच्या खर्चासाठी प्रतिवर्षी रु. 10,000/-

अर्ज करण्याची पद्धत

विहित नमुन्यातील अर्ज भरणे आवश्यक.

संपर्क कार्यालयाचे नाव

आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.

 

संकलन- नंदकुमार वाघमारे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate