অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती

गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती

राष्ट्र उभारणीमध्ये युवापिढीचे योगदान अत्यंत महत्वाचे असते. हे ओळखून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक शिकावे, सक्षम व्हावे या दृष्टिने भारत सरकार व महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवित असते. या योजनांपैकी एक महत्वपूर्ण योजना म्हणजे भारत सरकारची महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती ही योजना होय.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयामार्फत ही योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी/मार्च 2017 मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक (इयत्ता 12 वी) प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कला, वाणिज्य व विज्ञान या विद्याशाखांमधील उच्चतम गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी पुढील पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी पात्र आहेत.

या योजनेंतर्गत केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यासाठी 7417 इतक्या शिष्यवृत्ती नवीन मंजुरीसाठी निर्धारित केल्या आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी नवीन मंजुरीचे आणि प्रथम व व्दितीय नुतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने व शिष्यवृत्तीच्या तृतीय व चतुर्थ नुतनीकरणाचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत.

नवीन मंजुरीसाठी तसेच प्रथम व व्दितीय नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संबंधित गुणवत्ता यादीमध्ये समावेश असेल, त्याच विद्यार्थ्यांचे नवीन मंजुरी शिष्यवृत्तीसाठी अर्ज ऑनलाईन भरले जातील. विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत आधारकार्ड असणे आवश्यक आहे व त्याचा आधार क्रमांक हा त्याच्या बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे. अशा विद्यार्थ्यांची यादी संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

तथापि, एखाद्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल तर त्याऐवजी त्या विद्यार्थ्यांने आधार नोंदणी आयडी स्लीप किंवा बँक खाते पासबुकच्या प्रथम पानाची फोटोसह असलेली छायांकित प्रत किंवा पॅन कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत अथवा प्राचार्यांची सही व शिक्का असलेले विद्यार्थ्यांच्या ओळखीबाबतचे छायाचित्रासह असलेले प्रमाणपत्र इत्यादी यापैकी एका कागदपत्राची छायांकित प्रत जोडावी. नवीन मंजुरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 31.10.2017 ही आहे. तसेच प्रथम व व्दितीय नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. 30.9.2017 ही आहे.

नवीन मंजुरीसाठी तसेच प्रथम व व्दितीय नुतनीकरणासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या विस्तृत पद्धतीसाठी www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध जाहिरातीचे अवलोकन करावे. तसेच संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शिष्यवृत्तीसंबंधित सूचनांचे अवलोकन करावे. शिष्यवृत्तीच्या तृतीय व चतुर्थ ऑफलाईन नुतनीकरणासाठी मागील वर्षाच्या परीक्षेत किमान 60% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. तृतीय व चतुर्थ नुतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीच्या नुतनीकरणासाठीचा अर्ज www.dhepune.gov.in या संकेतस्थळावरुन डाउनलोड करावा व परिपूर्णरित्या भरुन आवश्यक त्या कागदपत्रांसह महाविद्यालयाकडे दि.20.10.2017 पर्यंत जमा करावा. महाविद्यालयाने प्राप्त अर्जांची छाननी करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र अर्ज दि. 30.10.2017 पर्यंत संबंधित सहसंचालक कार्यालयाकडे जमा करावेत. संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण कार्यालयाने पात्र विद्यार्थ्यांची विहित नमुन्यातील यादी उच्च शिक्षण संचालनालयास दि.15.11.2017 पर्यंत जमा करतील. विद्यार्थ्यांनी विहित मुदतीतच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

नवीन मंजुरी 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत तसेच प्रथम व व्दितीय नूतनीकरणासाठी 30 सप्टेंबर 2017 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाचे आहेत. योजनेची अद्ययावत माहिती, नुतनीकरणाच्या तृतीय, चतुर्थ वर्षासाठी ऑफलाईन अर्जाचा नमुना, मार्गदर्शक सूचनांसाठी संचालनालयाच्या www.dhepune.gov.in या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे. अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण किंवा उच्च शिक्षण संचालनालय, मध्यवर्ती इमारत, शिष्यवृत्ती विभाग, पुणे यांचा दूरध्वनी क्रमांक 020-26126939 वर संपर्क साधावा.

लेखक: देवेंद्र भुजबळ

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate