बर्फाच्या राज्यात किती गमती जमती,
चला चला मुलांनो चला संगती !
फर चा कोट चढवू अंगावरती,
गम बूट घालू, काठी धरू पुढती !
पांढरा शुभ्र याक, खूप खूप केसाळ,
अंगावर त्याच्या बर्फ आहे फेसाळ !
लाल लाल सफरचंद टप टप पडती,
पहाडी माणसाच्या गालावर खुलती !
बटाट्यांचा येथे आहे बर सुकाळ,
बर्फाच्या अंगणात नाचतात सर्वकाळ!
चिकू सारखे दिसते ते 'किवी' फळ,
आंबट - गोड गर खाऊन काढूया पळ !
देवदार - चिनार ची हिरवी-हिरवी शाल,
बर्फमय बुट्ट्याची किमया विशाल !
हिमनदी आहे जणू दुध- गंगा,
डोळे भरून पाहूया करू नका दंगा !
सोनेरी किरणे शिखरावरती,
हिम-मोती झेलुया अंगावरती !
बर्फाच्या राज्यात किती गमती जमती,
चला मुलांनो चला संगती !
माहिती संकलन: प्राची तुंगार
अंतिम सुधारित : 10/7/2020