मलेरिया डासांच्या चावण्याने विस्तार पावणारा एक गंभीर रोग आहे. दर वर्षी, संपूर्ण विश्वभरात 300 ते 500 मिलियन मलेरिया आणि 1 मिलियन बालमृत्युच्या बाबी आढळल्या आहेत. ज्या क्षेत्रांमध्ये सामान्यपणे मलेरियाच्या केसेस आढळल्या आहेत, त्या क्षेत्रांमध्ये, मलेरिया हे लहान मुलांच्या मृत्युचे आणि वाढ खुंटण्याचे एक प्रमुख कारण असू शकते.
मलेरिया गर्भवती स्त्रियांसाठी विशेषत: धोक्याचा आहेसे मानले जाते. ह्यामुळे ऍनिमिया, गर्भपात, स्टिलबर्थ (मृतजन्म) जन्माच्या वेळी कमी वजन असलेली मुले होणे, व प्रसूतीमरण देखील ओढवू शकते.
मलेरिया पासून बचाव आणि ह्यावर जलद उपचार केल्यानेच पुष्कळ लोकांचा जीव वाचू शकतो.
समुदायाच्या सर्व लोकांनी डासांच्या चावण्यापासून आपला बचाव करावा. विशेषत: लहान मुले आणि गर्भवती स्त्रियांनी आपला बचाव सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या समयी करावा, ज्यावेळी डास सर्वांत जास्त सक्रिय असतात.
अशा मच्छरदाण्या, पडदे किंवा चटया ज्या एखाद्या कीटकनाशकाने उपचारित असतील, त्यांच्यावर बसणाÚया डासांना मारून टाकतात. विशेष म्हणजे, नेहमीच उपचारित चटयांचा वापर करावा, किंवा मच्छरदाण्या, पडदे आणि चटयांना नियमितपणे कीटकनाशकांमध्ये बुडविले पाहिजे. साधारणपणे, मच्छरदाण्यांना पावसाळ्याच्या आधीच, कमीत कमी दर सहा महिन्यांत, आणि दर तिसÚया धुण्यानंतर, नीटनेटके करून ठेवावे. प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी तुम्हांला सुरक्षित कीटकनाशक पुनर्उपचाराच्या समयपालनाच्या बाबतीत सल्ला देऊ शकतो.
तान्ह्या आणि इतर लहान मुलांना उपचारित मच्छरदाणीच्या आतमध्येच झोपवावे. जर मच्छरदाण्या महाग असतील तर, कुटुंबाने एक खूप मोठी मच्दरदाणी घ्यावी ज्यामध्ये सारी लहान मुले झोपू शकतील. स्तनपान करणाÚया मुलांना आपल्या आई बरोबर मच्छरदाणीमध्ये झोपवावे.
जर उपचारित मच्छरदाणीचा वापर करू शकला नाहीत तर, इतर क्रिया मदत करतील:
जर कुटुंबात कोणाला ही ताप असेल तर किंवा लहान मुले जेवण नाकारू लागतील त्यांना ओकारी होत असेल, चक्कर किंवा झटका येत असेल तर मलेरियाची शंका आहे.
जर लहान मुलास मलेरियामुळे ताप आला असेल तर त्याला ताबडतोब आरोग्य कर्मचाÚयाने सांगितलेले औषध द्यावे. मलेरियामुळे ताप आल्यावर जर लहान मुलांना एक दिवसाच्या आत उपचार न मिळाल्यास मुलास मरणदेखील येऊ शकते.
कोणत्या प्रकारचा उपचार आणि किती वेळपर्यंत द्यावा याबद्दल आरोग्य कर्मचारी सल्ला देऊ शकतो. मलेरियाच्या रोगी मुलास ताप लवकर उतरला तरी पण, उपचाराचा पूर्ण कोर्स करायला हवा. जर उपचार पूर्ण केला नाही तर मलेरिया आणखी गंभीर आणि कठिण होऊ शकतो.
जर उपचाराच्या नंतर देखील मलेरियाची लक्षणे चालू राहतील तर, मुलास मदतीसाठी आरोग्य केंद्र किंवा इस्पितळात घेऊन जावे. समस्या ही देखील असू शकते:
मुलांस जोपर्यंत ताप आहे तोपर्यंत थंड ठेवणे:
इतर स्त्रियांच्या तुलनेत गर्भवती स्त्रियांना मलेरियामुळे जास्त त्रास होण्याची शक्यता आहे; हा रोग गर्भावस्थेच्या दरम्यान, विशेषत: पहिल्या वेळी गर्भधारणेच्या दरम्यान जास्त घातक आहे. यामुळे कारण गंभीर ऍनिमिया (रक्त पातळ होणे), गर्भपात, समयपूर्व प्रसव किंवा मृतजन्म होऊ शकतो. ज्या मुलांच्या मातांना गर्भावस्थेच्या काळात मलेरिया झालेला असेल, त्यांचे वजन सरासरी कमी आणि म्हणून ते मुलास संसर्गक्षम असतात तथा एक वर्षाच्या वयापर्यंत त्याच्या मरण्याची अधिक संभावना आहे.
जेव्हां जेथे आवश्यक असते, गर्भवती स्त्रियांना मलेरिया प्रतिरोधी गोळ्या घ्यायला हव्यात.
सर्व मलेरिया प्रतिरोधी गोळ्या गर्भावस्थेच्या काळात घेणे सुरक्षित नसते. कोणते औषध यावेळी चांगले आहे ते आरोग्य कर्मचारी सांगेल.
गर्भवती स्त्रियांनी डासांपासून संरक्षणासाठी नियमितपणे स्वच्छ केलेल्या मच्छरदाणी मध्येच झोपायला हवे.
ज्या गर्भवती स्त्री मध्ये मलेरियाची लक्षणे आणि चिन्हे आढळतील तिला मृत्युपासून वाचविण्यासाठी ताबडतोब आणि पुरेशा उपचारांची आवश्यकता आहे.
मलेरियाग्रस्त गर्भवती स्त्रीला आरोग्य कर्मचाÚयाकडून लोहतत्व आणि व्हिटॅमिन ए पूरकांसबंधी माहिती घ्यायला हवी.
मलेरिया ऊर्जा जाळून टाकतो, आणि घामाच्या द्वारे मूल पुष्कळसे शारीरिक तरल पदार्थ हरवून टाकते. मुलास थोड्या-थोड्या वेळाने खाणे आणि पाणी देत राहावे ज्यायोगे त्याच्या शरीरात कुपोषण आणि पाणी यांची कमतरता होऊ नये.
मुलांना वारंवार स्तनपान करविण्याने त्यांच्यात पाण्याची कमतरता होत नाही आणि मलेरियासमेत खूप सगळ्या संसर्गांसाठी प्रतिरोधक शक्ति कायम राहते, मलेरियाग्रस्त मुलांना वारंवार स्तनपान करविले पाहिजे.
वारंवार मलेरिया संसर्ग होण्याने मुलाच्या विकास आणि मेंदूची वाढ (मेंदूचा विकास) शिथिल होते आणि याच्यामुळे ऍनिमिया (रक्त पातळ होते½ होऊ शकते. ज्या मुलास मलेरियाचे झटके आले असतील त्याला ऍनिमियासाठी चेक करविणे चांगले ठरेल.
जेथे कोठे ही पाणी थांबून राहते, तेथे डासांचे प्रजनन होते – उदा., तलावांत, जनावरांच्या पाण्याच्या नांदीत, खड्डयांत, गटारांमध्ये आणि जेथे उंच गवत आणि झुडुपांबरोबर ओलसरपणा असेल तेथे ही. ते कालव्याच्या काठी आणि पाण्याच्या भांड्यांमध्ये, टाक्या आणि तांदुळाच्या शेतात देखील फोफावू शकतात.
डासांच्या संख्येत कमतरता आणली जाऊ शकते:
मलेरिया पूर्ण समुदायावर प्रभाव टाकतो. सर्व लोक मिळून डासांची वाढ थांबविण्यासाठी कीटकनाशकांच्या द्वारे मच्छरदाण्यांचे नियमित उपचार आयोजन करून डासांसाठी प्रजनन स्थान कमी करू शकतात. समुदायांनी त्यांच्या क्षेत्राच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि राजनैतिक नेत्यांना मलेरियाप्रतिरोध व नियंत्रण करण्यासाठी समुदायांची मदत करण्यासाठी सांगावे.
स्त्रोत : UNICEF
अंतिम सुधारित : 5/26/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...