आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा समावेश आपल्या जेवणामध्ये व खाण्यामध्ये रोजच्या रोज साधायला हवा. पुढे दिलेल्या ४ प्रमुख अन्न गटांमधील प्रत्येकामधून कोणत्या तरी पदार्थाचा समावेश आपल्याला प्रत्येक जेवणामध्ये व्हायलाच हवा.
प्रमुख अन्न म्हणजे आपल्या जेवणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात घेतले जाणारे व कमीत कमी खर्चात जास्त उर्जांक ( उष्णता व शक्ती ) देणारे अन्न होय. माणुस जेवढे जास्त श्रम करेल तेवढया जास्त प्रमाणात हे अन्न खावे लागते.
या प्रकारचे अन्न जरी सर्वात महत्त्वाचे असले तरीही फक्त तेवढेच घेऊन भागणार नाही. त्याच बरोबर इतर गटातील अन्नाचा सुध्दा आपल्या आहारात समावेश करायला हवा. असे केले नाही तर अशक्तपणा वाढेल. या गटात पुढील पदार्थांचा समावेश करता येईल. बटाटे, रताळे, भरपूर गार असलेली केळी, फणसा सारखी फळे इ.
बाजरी व नाचणी सारख्या कडधान्यात लोह व कॅल्शियम भरपूर, पुरेसा आणि विविध आहार ऐवढेच नव्हे तर त्यामध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थाचा समतोल साधला गेला पाहिजे. वर सांगितलेल्या अन्नगटाचा प्रत्येक गटातील पुरेसे खाद्यपदार्थ जर जेवणात असतील तर आरोग्य फारसे दुर नाही, पुष्कळ लोक भाकरी, केळी, वगैरेसारखी पिठुळ पदार्थच खातात आणि व वटाणे, बटाटे, डाळी, हिरव्याभाज्या आणि फळे इ. शरीरसंरक्षक व शरीरसंवर्धक खाद्यपदार्थ खात नाही, यामुळे कुपोषण होते.
स्त्रोत : पोषण आणि आहार : माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/5/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाल...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...