অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुरक्षित अन्न सर्वांचाच अधिकार

सुरक्षित अन्न सर्वांचाच अधिकार

सध्या बातम्यात काही अन्नपदार्थ सुरक्षित आहेत कि नाहीत ह्यावर बरीच चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने मी काही गोष्टी आपल्या निदर्शनास आणू इच्छिते.

जणु काही वर्ल्ड हेल्थ ऑरगनाइजेशनला (WHO) स्वप्न पडले म्हणूनच की काय यंदाच्या वर्षी आपण “Food Safety: Food from farm to plate make it safe”अशा स्लोगनेच आपण 7 एप्रिल 2015 रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला.

जे अन्न त्यातील अन्नघटकांची गुणवत्ता टिकवून धरतो ज्यामुळे त्या पदार्थात contamination होत नाही तसेच food-borne diseases(अन्नामुळे होणारे रोग) होत नाहीत आणि ते योग्य पद्धतीने शिजवलेले असेल व सुस्थितीत असेल तर ते अन्न सुरक्षित आहे असे समजावे.

Bacteria, viruses, parasites, chemicals, contamination, addatives, addultent मुळे अन्न असुरक्षित होते. Contamination हे विविध कारणांनी होते अगदी शेतकरी जेव्हा ते ध्यान पिकवतो तिथपासून ते खाण्यासाठी तयार केलेल्या पदार्थापर्यंत ते असुरक्षित होऊ शकते. भेसळयुक्त अन्न पदार्थ असल्यास तो पदार्थही असुरक्षित होऊ शकतो. साधारणतः भेसळ करण्यासाठी एक तर हलक्या दर्जाचे किंवा हानिकारक पदार्थ त्यामध्ये मिसळला जातो. भेसळीसाठी मग एखादा हलक्या प्रतीचा रंग वापरला जातो किंवा एखादा कमी किंमतीचा घटक त्यात मिसळला जातो. उदाहरणार्थ mouse ह्या पदार्थात तकाकी येण्यासाठी व्हेज जिलेटिन एवजी बीफ जिलेटिन चा वापर काहीजण करतात.

image-2पदार्थात मिसळण्यात येणाऱ्या घटकात कधी रंग मिसळला जातो तर कधी स्वाद वाढवण्यासाठी flavor enhancers वापरले जातात. Ready to eat पदार्थाच्या पाकिटावर त्या पाकीटातील पदार्थ बनवण्यासाठी काय काय जिन्नस वापरले आहेत ह्या संदर्भातील माहिती दिलेली असते. त्यात मिसळण्यात येणारे जिन्नस हे आहे त्या नावातच लिहिले असतात तर काही ठिकाणी ते E नंबर ह्या स्वरुपात उपलब्ध असतात. ह्या E नंबरच्या संदर्भातील माहिती खाली दिलेली आहे ह्यात तो नंबर कशासाठी वापरला जातो हे सांगीतले आहे.

E number 100 – 199 रंगांशी निगडीत

E number 200 – 299 प्रीझरवेटीवजशी निगडीत

E number 300 – 399 हा अॅटीऑक्सीडंटशी निगडीत

E number 400 – 499 हा thickeners, emulsifiers, and stabilizers n शी निगडीत

E number 500 – 599 हा anti-cacking agents

E number 600 – 699 flavour enhancer agents

E number 700 – 799 antibiotic

E number 900 – 999 glazing agents and sweeteners

E number 1000 – 1500 additional chemicals

image-3भेसळ साधारणतः अगदी मोहरी जि-यापासून ते तयार अन्न किंवा ready to eat पदार्थांपर्यंत होऊ शकते. उदाहरणार्थ मिठाई, फरसाण. नुकताच भेसळयुक्त पदार्थांच्या संदर्भात डॉक्टर अर्पिता ह्यांनी दिल्लीत एक शोध घेतला. ह्यात स्ट्रीट फूडमध्ये काही दोष आहे का हे तपासण्यासाठी समोसा, पाणीपुरी, बर्गर व मोमोजची 100 सॅम्पल गोळा केली आणि त्यांची तपासणी केली असता त्यातील 15% पदार्थ मध्ये दोष आढळले.

आशा असुरक्षित अन्न पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्य हेल्दी राहीलच असे नाही म्हणूनच FDA ही संस्था जागतिक पातळीवर लोकांना योग्य अन्न व औषधे मिळतात का नाही ह्या वर नजर ठेवून आहे. असा अंदाज वर्तविला जातो की साधारणतः 2.2 million लोक food-borne and waterborne म्हणजेच अन्न व पाण्याच्या दोषामुळे मृत्यूमुखी पडतात आणि त्यातही मुलांचं प्रमाण जास्त आढळते. केमिकल्स व टाॅकसीनमुळे क्राॅनीक आजार ते कॅन्सरच्या रोगापर्यंत त्रास होतो. तळकट, खारट व गोड पदार्थांच्या सेवनाने मधुमेह, रक्तदाब ह्या सारख्या रोगांचा धोका वाढतो.

अन्न सुरक्षित करण्यासाठी काही उपयुक्त टीप्स

•  सगळ्या पातळ्यांवर स्वच्छता राखा

•  शिजवलेले व कच्चे अन्न वेगवेगळे ठेवा

•  अन्न व्यवस्थित शिजवा

•  अन्नाचे तपमान योग्य राखा

•  सुरक्षित पाणी आणि कच्या मालाचा वापर करा.

 

माहिती संकलन: प्राची तुंगार

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate