वार्षिक तत्त्वावर जगभरात नोंदवल्या जाणा-या क्षयाच्या एकूण प्रकरणांपैकी एक पंचमांश प्रकरणे भारतातील असल्याने भारताला क्षयापासून सर्वात जास्त धोका आहे असं म्हणता येईल. भारतात आढळणा-या क्षयामध्ये सर्वसाधारण क्षयाचा प्रकार हा फुप्फुसाच्या क्षयाचा असला तरीही दरवर्षी फुप्फुसाच्या क्षयाखेरीज इतर प्रकारचा क्षय होण्याचं प्रमाणही लक्षणीय आहे.
भारतात आढळणा-या स्त्रीरोगांच्या एकूण प्रकरणांमध्ये स्त्रियांमधील जननेंद्रियाच्या क्षयाचं प्रमाण एक ते दोन टक्के आहे. ओटीपोटातील संसर्गापैकी ५ टक्केसंसर्ग हे या आजाराची परिणती असतात आणि फुप्फुसांचा क्षय असलेल्या १० टक्केप्रकरणांमध्ये अशा प्रकारचा क्षय उद्भवत असल्याचंही लक्षात आलं आहे.
हा आजार प्रामुख्याने जननक्षम वयोगटातील स्त्रियांमध्ये आढळत असला, तरी रजोनिवृत्तीनंतरही अनेक स्त्रियांना हा आजार झाल्याचं आढळून आलेलं आहे. आजकाल या आजाराच्या प्रमाणात वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे, याची कारणं पुढीलप्रमाणे आहेत.
लोकसंख्येतील वाढ
एचआयव्ही संसर्गामध्ये झालेली वाढ
जननेंद्रियाचा क्षय हा सर्वसाधारणपणे फुप्फुसाच्या क्षयाची परिणती म्हणून होतो. फुप्फुसातील संसर्ग रक्तावाटे मूत्रमार्ग, जननमार्ग, हाडे आणि सांध्यापर्यंत पोहोचतो.
स्त्रियांना फुप्फुसांचा क्षय असेल तर अंडवाहिनीला संसर्ग होण्याचे प्रमाण १०० टक्के, गर्भाशयाच्या अंत:स्तराला संसर्ग होण्याचं प्रमाण ५० टक्के, अंडाशयाला संसर्ग होण्याचे प्रमाण २० टक्के, ग्रीवेच्या संसर्गाचं प्रमाण ५ टक्केतर योनी आणि बाहय़जननेंद्रियाला होणा-या संसर्गाचं प्रमाण एक टक्क्याहून कमी असतं.
जननेंद्रियाचा क्षय असलेल्या जोडीदारासोबत संभोग केल्यास संसर्गाची थेट लागण होऊ शकते.
चिकित्सेचे स्वरूप कसं असतं?
स्त्रियांमधील जननेंद्रियाच्या क्षयाची लक्षणं सहज दिसून येत नसल्याने या आजाराचं निदान करणं अवघड असतं. तसंच हा आजार झालेल्या ६० टक्केस्त्रियांना वंध्यत्व येतं आणि ऊर्वरित रुग्णांना खालील लक्षणे जाणवतात -
ओटीपोटातील वेदना
मासिक पाळीच्या समस्या निर्माण होतात. (मासिक पाळीच्या स्रवाला दरुगध येणे किंवा मासिक पाळी थांबणे असे विकारही संभवतात.)
एण्डोमेट्रियल बायोप्सी
पाळीच्या रक्ताचा संवर्ध (कल्चर ऑफ मेन्स्ट्रअल ब्लड)
लेप्रोस्कोपी
या उपाययोजनांनी फरक पडू शकतो
एटीटी किंवा रिस्टोरेटिव्ह सर्जरी अशा दोन शस्त्रक्रिया असतात. यांना जननक्षमतेत सुधारणा करणा-या शस्त्रक्रिया असंही म्हणतात. अशा एटीटी शस्त्रक्रियेचा पूर्ण कोर्स करून आणि सुयोग्य अशी रिस्टोरेटिव्ह सर्जरी करून जननमार्गाचे कार्य पूर्ववत करता येऊ शकते.
जननेंद्रियाचा क्षय झालेल्या स्त्रीयांनी संपूर्ण उपचार योजना घेणं आवश्यक असतं. मात्र कोर्स पूर्ण केल्यावरही त्यांना गर्भधारणा होण्याची शक्यता अतिशय कमी असते. या स्त्रियांना बहुतेक वेळा एआरटी/आर्टची मदत घ्यावी लागते. आयव्हीएफ उपचार योजनेनेही अशा स्त्रियांना आशेचा किरण दाखवलेला आहे.
स्त्रोत : प्रहार
अंतिम सुधारित : 10/7/2020
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...