अंतस्त्वचा
अंतस्त्वचा : (एंडोडर्मिस). वाहिनीवंत (पाणी अथवा अन्नरसांची ने-आण करणारे शरीरघटक असणाऱ्या) वनस्पतींत सामान्यपणे सर्व मुळांत ⇨ ओषधीय व
⇨ वाहिनीवंत अबीजी वनस्पतींच्या खोडात, तसेच ⇨प्रकटबीज वनस्पतींच्या पानांत, मध्यत्वचेच्या सर्वांत आतील कोशिकाथरास ‘अंतस्त्वचा’ म्हणतात. हा वर्तुळाकार थर विशेषत्व पावलेला असतो व संरचनावैशिष्टयामुळे तो ओळखता येतो. याच्या आतील बाजूस वाहक (रंभाचा) भाग असतो.