यकृत
यकृत : सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत आढळणारा हा एक मोठा ग्रंथीवजा अवयव आहे. तो आद्य अग्रांत्रापासून (आतड्याच्या सुरुवातीच्या भागापासून) निर्माण झालेला असतो. मानवासहित सर्व पृष्ठवंशी प्राण्यांत त्याची रचना आणि कार्य सारखेच असते.