युफ्रेटीस
युफ्रेटीस : पश्चिम आशियातील सर्वांत लांब नदी. लांबी २,७०० किमी. नदीचे अल्-फरात हे अरबी, तर फिरात किंवा फ्रात हे तुर्की नाव आहे. तुर्कस्तानच्या मध्यपूर्व भागाच्या प्रदेशातील पर्वतीय कारास्यू (पश्चिम युफ्रेटीस) व मुरात्स्यू (पूर्व युफ्रेटीस) या शीर्षप्रवाहांच्या एलाझ येथील संगमापासूनच्या पुढील संयुक्त प्रवाहास युफ्रेटीस असे संबोधले जाते.