रशीद अद्–दीन
रशीद अद्–दी न : (कार. ११६०−९२). सिरियातील असॅसिन या इस्माइली गुप्तपंथाचा प्रमुख आणि धर्मयुद्धातील तिसऱ्या मोहिमेमधील एक सेनानी. त्याच्या पूर्व आयुष्याविषयी तसेच जन्ममृत्यूंच्या तारखांविषयी माहिती उपलब्ध नाही. असॅसिन चळवळ व त्यातील त्याचे कार्य यांविषयी तत्कालीन कागदपत्रांतून थोडीफार माहिती मिळते.