खरबूज
खरबूज : (चिबूड; हिं. काचरा; गु. चिबडू, शक्कर टेटी; क. कळंगिड; सं. मधुपाक, कर्कटी; इं. मस्क मेलॉन, स्वीट मेलॉन; लॅ. कुकुमिस मेलो; कुल-कुकर्बिटेसी). या वेलीची विशेषतः उत्तर प्रदेश, गुजरात व दख्खन येथे पण भारतात सर्वत्र, नद्यांच्या वाळवंटात लागवड करतात.