ख्रिसमस बेट
ख्रिसमस बेट : हिंदी महासागरातील ऑस्ट्रेलियाच्या ताब्यातील बेट. क्षेत्रफळ १३५ चौ. किमी. लोकसंख्या २,७४१ (१९७२ अंदाज). पैकी ७५ टक्के चिनी. लांबी सु. १८ किमी.; रुंदी ७ किमी. हे ९०० २५’ २२” द. १०५० ३९’ ५९” पू. यांच्या दरम्यान फ्रीमँटलच्या उत्तरेस २,६०८ किमी. जावाच्या दक्षिणेस ३५८ किमी. व सिंगापूरच्या दक्षिण – आग्नेयीस १,३०५ किमी. आहे.