सुलेमान पर्वत
सुलेमान पर्वत : पाकिस्तानातील एक पर्वतरांग. मध्य पाकिस्तानात सिंधू नदीच्या पश्चिमेस दक्षिणोत्तर पसरलेली ही रांग गुमलखिंड ते जाकोबाबादच्या उत्तरेपर्यंत सु. ५०० किमी. लांबीची आहे. रांगेची सर्वसाधारण उंची १,८०० मी.–२,१०० मी. असून तख्त-इ-सुलेमान किंवा सॉलोमन्स थ्रोन हे या रांगेतील जुळे शिखर सर्वोच्च (५,६३३ मी.) आहे.