टॉन्सिल
शात असलेल्या लसीका ग्रंथींचा एक समूह. टॉन्सिल हा शब्द इंग्रजी भाषेतील असून मराठीत त्याला गलवाताम म्हणतात. साधारण द्राक्षाच्या आकाराच्या या ग्रंथी गुलाबी रंगाच्या असतात. यांपैकी सर्वसाधारणपणे टॉन्सिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दोन ग्रंथी घशाच्या मागे दोन्ही कडांवर असतात.