मुसोलिनी, बेनीतो
मुसोलिनी, बेनीतो : (२९ जुलै १८८३–२८ एप्रिल १९४५). इटलीचा हुकूमशहा (१९२२–४३) व फॅसिझम या तत्त्वप्रणालीचा प्रवर्तक. त्याचा जन्म सामान्य लोहाराच्या कुटुंबात दोव्हिया (प्रेदॉप्या) येथे झाला. त्याचे वडील आलेस्सांद्रो हे समाजवादी असून लोहारकाम करीत, तर आई रॉझा ही प्राथमिक शाळेत शिक्षिका होती.