आर्क्टिक प्रदेश
आर्क्टिक प्रदेश : पृथ्वीच्या अगदी उत्तरेकडील, आर्क्टिक महासागराच्या किनाऱ्याकडील प्रदेश. ध्रुवतारा ज्या पुंजात आहे त्याला पाश्चात्त्य खगोलशास्त्रात 'छोटे अस्वल' या अर्थाचे नाव आहे. ग्रीक भाषेत आर्कटॉस म्हणजे अस्वल; त्यावरून उत्तर ध्रुवाभोवतीच्या प्रदेशाला 'आर्क्टिक' हे नाव पडले. काही लोक उत्तर-ध्रुववृत्त, ६६० ३०' उ. अक्षवृत्त, ही या प्रदेशाची मर्यादा मानतात. परंतु हवामान व जीवन या दृष्टींनी उत्तरेकडील तरुरेषा ही यापेक्षा अधिक समर्पक मर्यादा आहे.