महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ : महाराष्ट्र राज्यामध्ये मोटारींद्वारा प्रवाशांची व्यापारी तत्त्वावर वाहतूक करण्याकरिता १९६१ साली स्थापन करण्यात आलेले महामंडळ. पहिले महायुद्ध संपल्यानंतर १९२० मध्ये भारतात शिल्लक सैनिकी वाहनांच्या विक्रीमुळे मोटारींद्वारा व्यापारी वाहतुकीला संधी मिळाली.