कावीळ
रक्तात पित्तरंजकद्रव्याचे प्रमाण (पित्ताला ज्या द्रव्यामुळे रंग येतो त्याचे प्रमाण) वाढल्यामुळे त्वचा,डोळयाच्या बुबळाचा पांढरा भाग, नखे वगैरे ठिकाणी ते साठून राहते व त्यामुळे त्या ठिकाणी पिवळेपणा दिसू लागतो; या स्थितीला कावीळ किंवा कामला असे म्हणतात.