बंबाखू
बंबाखूच्या जाती उपद्रवकारक व दीर्घकाळ जगणारे तण आहेत आणि त्यांना अगदी बारीक व असंख्य बिया येतात. प्रचंड बीजोत्पादन व त्याच्या जोडीला १० वर्षापर्यंत टिकणारी त्यांची अंकुरणक्षमता आणि वाऱ्याद्वारे होणारा प्रसार यांमुळे त्याचे नियंत्रण करणे मुष्कील झाले आहे.