सांगली जिल्हा
महाराष्ट्र पश्चिम भागातील एक जिल्हा. क्षेत्रफळ ८,६५६ चौ. किमी. महाराष्ट्र एकूण भूक्षेत्राच्या २·८०% क्षेत्र या जिल्ह्याने व्यापले आहे. लोकसंख्या २८,२०,५७५ (२०११). अक्षवृत्तीय विस्तार १६° ४५' उ. ते १७° २२' उ अक्षांश.रेखावृत्तीय विस्तार ७३° ४२' पू. ते ७५° ४०' रेखांश. पूर्व-पश्चिम लांबी २०५ किमी.