मुंगी
मुंगी : मुंग्या माश्यांप्रमाणे सर्वांना परिचित असून जगातील सर्व देशांत आढळतात. फार पुरातन कालापासून मानवाच्या सन्निध राहिलेल्या या कीटकाबद्दलचे उल्लेख वेदादी प्राचीन ग्रंथांतून आपणास आढळतात. मुंग्या बहुतकरून जमिनीतील वारुळात राहत असल्याने त्यांचा रोजचा जीवनक्रम समजण्यास फार कठीण जाते.