आसूनस्यॉन
आसूनस्यॉन : दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वाय देशाची राजधानी. लोकसंख्या ४,३७,१३६ (१९७० अंदाजे). पॅराग्वाय नदी व पील्कोमायो नदी यांच्या संगमावरील एका निसर्गरम्य भूशिरावर हे १५ ऑगस्ट, (ख्रिश्चनांमधील अॅझम्शन डे) १५३७ रोजी वसविले गेले. पॅराग्वायमधील हे एकमेव मोठे शहर असून देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक घडामोडींचे केंद्रस्थान आहे.दक्षिण अमेरिका खंडात मध्यवर्ती मोक्याच्या ठिकाणी असल्याने हे दळणवळणाचे प्रमुख केंद्र आहे.