रूपनारायण
रूपनारायण : भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातून वाहणारी गंगा (हुगळी) नदीची उपनदी. लांबी २४० किमी. छोटा नागपूर पठाराच्या पूर्वेकडील पायथ्याच्या टेकड्यांपैकी तिलाबानी टेकडीत पुरूलिया शहराच्या ईशान्येस ही नदी उगम पावते. दुमडा गावाजवळ ती पुरूलिया जिल्हातून बांकुरा जिल्ह्यात प्रवेश करते.