हंगेरी
हंगेरी : मध्य यूरोपातील कार्पेथियन खोऱ्यातील भूवेष्ठित देश. क्षेत्रफळ ९३,०३० चौ. किमी. लोकसंख्या ९९,८५,७२२ (२०११ अंदाज). विस्तार ४५° ४८’ उ. ते ४८° ३५’ उ. अक्षांश व १६° ५’ पू. ते २२° ५८’ पू. रेखांश यांदरम्यान. याच्या उत्तरेस स्लोव्हाकिया, ईशान्येस युक्रेन, पूर्वेस रूमानिया, दक्षिणेस सर्बीया व क्रोएशिया, नैर्ऋत्येस स्लोव्हेनिया व पश्चिमेस ऑस्ट्रिया हे देश आहेत.