অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सौर पुराण

सौर पुराण

सौर ऊर्जेवरील सचित्र माहिती.

सौर उर्जा हे फक्त फुकटचे इंधन नाही ती पर्यावरणस्नेही जगण्याची सुरवात आहे..

या सौर उर्जेचा रंजक चित्रमय इतिहास सौरपुराण

लेखक : अरविंद गुप्ता

प्रकाशक : श्रीनिवास पंडित, उर्जा प्रकाशन, पुणे

लेखकाचे मनोगत

सूर्य सर्वव्यापी आहे आणि आपल्या भारतात तर सूर्यप्रकाश जरा जास्तच आहे असं आपल्याला वाटत. पण त्यान नुसतच घामाघूम होण्यापेक्षा आपण सूर्यप्रकाशाचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी आणि वीज तयार करून घर उजळण्यासाठी करू शकतो. जमिनीच्या १५० सें.मी. x १५० सें.मी. तुकड्यावर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा पूर्ण उपयोग करू शकतो, तर इतर कुठल्याही इंधनाशिवाय आपण त्या उष्णतेवर अन्न शिजवू शकू.

भारतात भरपूर सूर्यप्रकाश आहे आणि म्हणूनच ह्या शास्वत आणि स्वच्छ उर्जास्त्रोताचा आपण पुरेपूर वापर करायला हवा.  खर तर अजूनही सौर उर्जेवर म्हणावे तेवढे संशोधन होत नाही.  भारतात आजही ४० कोटी लोक विजेपासून वंचित आहेत.  म्हणून तरी आपण चांगले व स्वस्त सौर घट बनवायला हवे आहेत आणि कार्यक्षम सूर्यचुलीही बाजारात आणायला हव्या आहेत.  सौर उर्जा वापरून छोट्यातल्या छोट्या गावात वीज नेणे शक्य होईल.  त्याने सत्तेच्या विकेंद्रीकरणाचे व सामान्य लोकांच्या सबलीकरणाचे महात्मा गांधीजींचे स्वप्न साकार होईल.

पवन उर्जेच्या वापराची भारतात सुरवात झालीच आहे. सुझलॉन ह्या खाजगी कंपनीने पवन चक्क्या बसवून ६००० मेगावॅट प्रदूषणमुक्त वीजनिर्मितीची क्षमता प्रस्थापित केली आहे.  भारत सरकारने पवन उर्जेसंबधी योग्य धोरणे राबवली करातही सवलती दिल्या हे त्याचे प्रमुख कारण आहे.  अशीच धोरणे सौर उर्जेच्या बाबतीतही राबवायला हवीत.

पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

स्त्रोत :अरविंदगुप्ता टॉइज

अंतिम सुधारित : 7/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate