‘पाणी वाढवता येत नाही, केवळ व्यवस्थापित केले जाऊ शकते’ असे रामदास अतिशय तात्विकपणे आणि जबाबदारीने सांगत होते. पुणे जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागातील उपसरपंच असल्यामुळे पाण्यासाठी गावकऱ्यांना होणारा त्रास पाहिल्यामुळे त्यांना हे शहाणपण आले होते.
रामदास हे पुणे जिल्ह्यातील उगलेवाडी गावातील भोजनेवाडी, या टेकडीवरील 40 घरांची वस्ती असलेल्या भागातील रहिवासी आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे आपल्या समुदायाने विशेषतः महिलांनी स्वच्छ पाण्यासाठी घेतलेले कष्ट जवळून पाहिले आहेत. भौगोलिक रचनेमुळे गावातील पिण्याचे पाणी नळाच्या माध्यमातून याठिकाणी पोहोचवणे कठीण आहे.
उगलेवाडी येथील मुख्य गावठाणात नदीचे पाणी टाकीत जमा करुन नळाच्या माध्यमातून पुरवठा करण्याची व्यवस्था आहे. या माध्यमातून गावठाणातील प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा केला जातो. मात्र, भोजनेवाडी पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. उंचवटा आणि बेसाल्ट खडकाचा भूभाग असल्यामुळे अगोदर भोजनेवाडी ‘शिवकालीन पाणीसाठा योजने’वर अवलंबून होते.
परिसरातील लोकांचा विशेषतः महिलांचा त्रास कमी व्हावा यासाठी रामदास यांनी भागाला स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी वस्तीजवळच 5,000 लिटर क्षमतेची टाकी बांधली. यामुळे दूर अंतरावरुन पाणी आणण्याचा त्रास वाचला. या टाकीत शिवकालीन साठ्यातून सायफन पद्धतीने पाणी चढवण्यात आले आणि सर्व 40 घरांना नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात आला. टाकीचा पाणीसाठा सुधारण्यासाठी, युनिसेफ-मुंबईस्थित ‘ड्रॉप ऑफ होप’ आणि जलजीवन मिशनच्या माध्यमातून टाकीची खोली वाढवण्यात आली आणि दुरुस्ती करण्यात आली.
पाणीपुरवठा सुरळीत आणि गुणात्मक व्हावा, यासाठी रामदास यांनी स्थानिकांना जमा केले आणि वर्षभरातील पिण्याच्या पाण्याविषयीचे काही नियम घालून दिले. नागरिकांनीही पाण्याच्या योग्य वापराविषयी नियम घालून घेतले. भोजनेवाडीने, केवळ पावसाळ्यातच सायफन पद्धती वापरण्याच निर्णय घेतला. उर्वरीत आठ महिन्यांमध्ये शिवकालीन साठ्यांमधून पाणी आणण्यात येते.
हे लोकसहभागातून विकेंद्रित पाणी व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण बनले आहे. पाण्याचा योग्य वापर होत असल्यामुळे, भोजनेवाडीला आता उन्हाळ्यातही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत नाही.
महाराष्ट्रातील पाण्याचे संकट वर्षानुवर्षाचा दुष्काळ आणि अनियमित पावसामुळे आणखी गंभीर बनले आहे, कमी होत जाणारी पाणी पातळी धोक्याची घंटा आहे. अशा परिस्थितीत, भोजनेवाडीतील गावकऱ्यांनी समुदाय सहभागितेने केलेले कार्य ताज्या हवेची झुळूक असल्यासारखे आहे. केंद्र सरकारची प्रमुख योजना जल जीवन मिशन- ग्राम पंचायती, स्थानिक समुदाय आणि रामदास यांच्यासारखे खरे हिरो यांना खेड्यांमध्ये पाणीपुरवठ्याचे नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन, कृती आणि देखभाल आणि गावकऱ्यांमध्ये जागृती करते, यात योजनेचे यश आहे.
जल जीवन मिशनच्या माध्यमातून दररोज एका व्यक्तीला 55 लिटर पाणी पुरवण्याचे लक्ष्य आहे आणि देशातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नियमितपणे दीर्घकालीन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्यात येईल. ग्रामीण भागात प्रत्येक घरासाठी नळ जोडणीची तरतूद केल्याने महिला, विशेषत: मुलींचे ‘कंटाळवाणे’ काम दूर होण्यास मदत होईल. तसेच यामुळे ग्रामीण जनतेच्या जीवनमानात सुधारणा होईल.
Source : PIB
अंतिम सुधारित : 8/22/2020