অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सौर कविता

सौर प्रतिज्ञा

सूर्य माझा प्राण आहे.

सोलर माझी जाण आहे.

माझ्या शिक्षकांवर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातील IITB शिक्षण संस्थेचा मला अभिमान आहे.

या सौर दिव्याची जोडणी आणि माहिती देण्याचे यश माझ्या अंगी यावे म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.

माझा सौर दिवा आणि वॉटर संस्था यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे.

त्यांची प्रगती आणि कीर्ती यातच माझे सौख्य सामावले आहे.

कवी : घुले सचिन ज्ञानदेव व भुजबळ ज्ञानेश्वर लक्ष्मण

सौर ऊर्जेचा प्रकाश

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश

दरी खोरयातून वाहे सौर ऊर्जेचा प्रकाश

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश

गाव जागे झाले सारे पायवाटा जाग्या झाल्या

सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या

एक अनोखा सौर दिवा, आला घरात घरात

सौर दिवा पाहुनी मुले झाली आनंदी

सौर ऊर्जा हि जुनीच आली नव्याने सौर दिव्याच्या रुपात

क्षणा पूर्वी वाटे गाव उदास उदास

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश

कवी : फसाबाई साहेबराव कोंढार (पुरुषवाडी)

सोलर लंम्प

तुटे अंधाराचे जाळे तिथे मोकळा प्रकाश

जिथे जिथे सोलर लंम्प तिथे अंधार गायब

जिथे जिथे सोलर लंम्प तिथे तिथे आनंदी आनंद

सौर दिव्याच्या प्रकाशाने होते अभ्यासाला मदत

अभ्यास केल्याने आपले जीवन होते प्रकाशमय

तुटे अंधाराचे जाळे तिथे मोकळा प्रकाश

जिथे जिथे सोलर लंम्प तिथे अंधार गायब

कवी : सुभाष फटांगरे

सौर दिवा

असा IITB मुंबई णे सौर दिवा आणला छान

वाटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट णे दिलाय मान

केंद्र सरकारचा लई अभिमान

महाराष्ट्र शासनाची त्याला संगत छान

असा हा दशलक्ष सौर ऊर्जा प्रकल्प

होणार हो हो होणार महाराष्ट्र प्रसिध्द

असा हा सौर दिवा प्रत्येक

विद्यार्थांना अभ्यासात करणार प्रगत

असा हा सौर दिवाचा महिमा भारी

प्रत्येकाला लागली हो अभ्यासात गोडी

आता शिकून पुढे जाणार

नाही वळूनी मागे बघणार

कवी : उमेश फटांगरे

सौजन्य : “Localization of Solar Energy through Local Assembly, Sale and Usage of 1 Million Solar Urja Lamps (SOUL) “

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate