भारतात तिची लागवड विशेषतः कर्नाटकामध्ये होते. ही वनस्पती मिरीच्या वंशातील एक जाती असल्याने त्यांचे अनेक लक्षणांत साम्य आहे. [मिरे].अश्मगर्भी( आठळीयुक्त) फळे मिरीसारखी पण लांब देठाची असून अपक्व असताना सुकवून ठेवतात. ती उदी रंगाची व वावडिंगापेक्षा किंचित मोठी असतात.त्यांत ४-१३% बाष्पनशील( उडून जाणारे) तेल व क्युबेबीन हे अल्कलॉइड असते.फळाला कंकोळ असेही म्हणतात व तो पानाच्या विड्यात घालतात.तो कडवट , तिखट व उग्र वासाचा असून सुगंधी द्रव्ये , मसाले , व औषधे यांत वापरतात.कफ व परमा यांवर तो गुणकारी असतो.
लेखक: वैद्य, प्र.भ.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
कंकोळ ही वनस्पती पायपरेसी या कुलातील आहे. हिचे शास...