অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कवला

कवला

कवला (कौला; लॅ. सिट्रिस क्रेनॅटफोलिया; कुल-रूटेसी).

हा एक संत्र्याचा कनिष्ठ प्रकार असून तो फक्त उत्तर प्रदेश व आसाममध्ये आढळतो. या झाडाच्या फांद्या आणि पाने खाली वाकलेली असतात.

झाडाचा रंग पांढुरका असतो. फळ मोठे, साल सुरकुतलेली, मगज (गर) पिवळट व चवीने आंबट असून निकृष्ट दर्जाचा असतो.

फळात बिया फार असतात. फळाच्या वरच्या बाजूला देठाच्या जागेखाली गोलाकार उठावदार रेषेसारखा भाग असतो. हवामान, जमीन,मशागतइ.संत्र्याप्रमाणे.

 

 

लेखक: म. वा. ठोंबरे

ह. चिं. पाटील

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/19/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate