অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुरडू

कुरडू

कुरडू
(हि. सफेद मुर्धा; गु. लांबडी; क. गोरंजि; सं. वितुन्न भुरूंडी; लॅ. सेलोशिया अर्जेन्शिया कुल-अ‍ॅमरँटेसी). ही लहान वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी तणाप्रमाणे पावसाळ्याच्या शेवटी भारतात आणि उष्णकटिबंधात शेतात व इतरत्र आढळते. खोड व फांद्या पन्हाळीदार; पाने साधी, विविध, एकाआड एक; अग्रस्थ कणिशावर लहान, सच्छद, प्रथम गुलाबी नंतर पांढरी फुले सप्टेंबर—डिसेंबरमध्ये येतात. परिदले १—५, केसरदले ५; केसरतंतु तळाशी परस्परांशी जुळून पेल्यासारखा व पातळ भाग बनतो; किंजपुट ऊर्ध्वस्थ, बीजके ४—८ फूल; फळ करंडरूप; बिया चापट, काळ्या, चकचकीत असून त्यांचा उपयोग अतिसार, रक्तदोष, मुखव्रण, नेत्ररोग, दृष्टीदोष, मूत्ररोग इत्यादींवर करतात. कुरडूच्या काही शोभिवंत जाती (से. प्ल्युमोजा व से. क्रिस्टॅटा-मोरशिखा) बागेत लावतात. (चित्रपत्र ५३).

स्त्रोत: द. सी. चौगले

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate