(घायमारी कुल). फुलझाडांपैकी ] ⇨ रोझेलीझ गणातील एक कुल. यामध्ये सु. ३५ वंश व १,५०० जाती आहेत; त्यांचा प्रसार ऑस्ट्रेलिया व ओशिअॅनिया ह्यांखेरीज सर्वत्र आहे. बहुतेक सर्व वनस्पती बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) क्षुपे (झुडपे) वा ⇨ओषधी आहेत.
पाने साधी, क्वचित विभागलेली व मांसल; पुष्पबंध (फुलोरा) बहुधा कुंठित (सर्पगती वल्लरी), क्वचित परिमंजरी [→ पुष्पबंध], फुले, नियमित, द्विलिंगी, क्वचित एकलिंगी, परिकिंज; संदले ४-५ व दीर्घस्थायी.
प्रदले ४-५, क्वचित जुळलेली [→ कॉटिलेडॉन]; केसरदले प्रदलाइतकी वा दुप्पट; किंजदले बहुधा प्रदलाइतकी व सुटी, क्वचित तळाशी जुळलेली व प्रत्येकाच्या तळाशी खवल्यासारखा मधुरसप्रपिंड; किंजपुट ऊर्ध्वस्थ [→ फूल]; घोसफळ पेटिकाफळांचे बनलेले, बीजे अनेक व बारीक.
या कुलामध्ये ⇨कलांचो, सेडम, कॉटिलेडॉन इ. सामान्य वंश आहेत. अनेक जाती बागेत शोभेकरिता लावतात व काही औषधांत वापरतात. रुक्ष जमिनीत त्या चांगल्या वाढतात.
लेखक: द. सी. चौगले
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 4/22/2020