অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घणसरी

घणसरी

घणसरी

(घणसर, गणासूर, गानसुरी; हिं. चुक्का; सं. नागदंती, भूतांकुश; लॅ.क्रोटॉन ऑब्लाँगिफोलियस; कुल-यूफोर्बिएसी) सु. ६-९ मी. क्वचित १२ मी. उंची व ०.६-०.९ मी. घेर असलेला हा पानझडी वृक्ष भारतात सर्वत्र, ब्रह्मदेशात व श्रीलंकेत आढळतो. साल २.५ सेंमी. जाड, भूरी वा तपकिरी असून कोवळे भाग व फुलोऱ्यावर रुपेरी खावले असतात. पाने सोपपर्ण (उपपर्णयुक्त), साधारण आंब्याच्या पानासारखी, एकाआड एक व दातेरी असून फांद्यांच्या टोकास दाटीने येतात. फुले एकलिंगी, लहान, पिवळसर हिरवी असून पुं-व स्री-पुष्पे  एकत्र, लांब मंजिऱ्या वर फेब्रुवारी-एप्रिलमध्ये येतात व अर्धवट गोलसर, त्रिखंडी बोंडे एप्रिल-मेमध्ये येतात [  युफोर्बिएसी ]. साल, मुळे, फळे व बिया रेचक (सर्पदंशामध्ये देतात). साल व मुळे आरोग्य पुनःस्थापक; सालाचा उपयोग लचकणे, मुरगळणे वं संधिवात यांवर बाहेरून सावण्यासाठी करतात. यकृतवृद्धीवर व सतत तापावरही ती देतात. बियांचे तेल रेचक व कीटकनाशक असते. लाकूड पिवळट पांढरे, मध्यम प्रतीचे, कठीण, जड आणि किरकोळ उपयोगाचे असते

 

 

लेखक -जमदाडे, ज. वि.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate