অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घाणेरी

घाणेरी

घाणेरी

(टणटणी; गु. घाणी दालिया, इंद्रधनु; क. हेसिके; इं. लँटाना; लॅ. लँटाना कॅमरा कुल-व्हर्बिनेसी). ह्या काटेरी क्षुपाचे (झुडपाचे) मूलस्थान अमेरिकेतील उष्ण प्रदेश असून त्याचा श्रीलंकेत १८२४ साली प्रवेश झाला. भारतात ते प्रथम शोभेकरिता आणले गेले पण आता प. महाराष्ट्र, कर्नाटक इ. राज्यांत कोठेही व उप्ण कटिबंधात सामान्यपणे आढळते. ते इतके झपाट्याने व वेडेवाकडे वाढते की, त्याचे निर्मूलन करणे कठीण जाते; फुले येण्यापूर्वी कापून टाकल्यास वाढीस आळा बसतो. फांद्या चौकोनी, खरबरीत व काटेरी; पाने साधी, समोरासमोर दंतुर असून फुलोरा स्तबकासारखा असतो. फुले लहान, पिवळी, नारिंगी व सच्छद असतात; संवर्त लहान, नलिकाकृती, पातळ, केसाळ; पुष्पमुकुट नलिकाकृती व खंड ४-५, पसरट; केसरदले चार; दीर्घद्वयी, अंतःस्थित किंजपुटात दोन कप्पे व दोन बीजके [ फूल]; फळ अश्मगर्मी (आठळीयुक्त) असून त्याचे दोन एकबीजी भाग (अष्ठिका) स्वतंत्र होतात. कृत्रिम संकराने नवीन अनेकरंगी प्रकारांची पैदास झाली आहे. बागेला संरक्षण व शोभा आणण्यास याची कुंपणाकरिता लागवड केली जाते. याची एक रानटी जात (लँ. इंडिका ) जांभळट फुलांची असून तीही बागेत लावतात. घाणेरीचा काढा धनुर्वात, संधिवात. हिवताप इत्यादींवर देतात. ही वनस्पती जंतुनाशक, स्वेदकारी, ज्वरनाशी, वायुनाशी व कृमिनाशक असते. (चित्रपत्र).

पहा : व्हर्बिनेसी.

चौगले, द. सी.

 

 

 

 

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate