অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चाफा, कनक

चाफा, कनक

कनक चाफा : फुलाफळांसह फांदी

चाफा, कनक

(ही. खांबर, रामधन चंपा; क. नारोळे, मुद्दा; सं. कनकचंपा; इं. गोल्डन चंपक; लॅ, ऑक्ना स्क्वॅरोजा,

ऑ. जाबोटापिटा; कुल-ऑक्नेसी).

 

 

 

ह्या सु. २.५ मी. उंच, सुंदर, पानझडी व लहान वृक्षाचा प्रसार कोकणतील व उत्तर कारवारातील दाट जंगले, बिहार, ओरिसा, आसाम, तामिळनाडू, ब्रह्मदेश आणि श्रीलंका येथे आहे.

साल पातळ, भुरी किंवा करडी व गुळगुळीत असते. पाने साधी, लंबगोल, चकचकीत, एकाआड एक व आखूड देठांची असून हिवाळ्यात गळतात व फेब्रुवारी-मार्चमध्ये नवीन पालवी येते.

फुले असंख्य, पिवळी, मोठी, सुवासिक असून चवरीसारख्या परिमंजरीवर [⟶ पुष्पबंध] फेब्रुवारी-एप्रिलमध्ये येतात. घोसफळ ३-६ लहान, अश्मगर्भी (आठळीयुक्त) फळांचे बनलेले असून त्यावर दीर्घस्थायी संवर्ताचे आवरण असते [ फळ]. नवीन लागवड बिया आणि कलमे लावून करतात.

लाकूड तांबूस भुरे, लवचिक व कठिण असून चांगले रापविले नाही तर भेगाळते. हातातल्या काठ्या, कोरीव जडावाचे काम यांसाठी त्याचा उपयोग करतात. पाला जनावरे खातात; आकर्षक फुलांसाठी व शोभेसाठी ही झाडे बागेत लावतात.

मुळांचा काढा मासिक पाळीच्या दोषांवर तसेच दमा, क्षय यांवरही देतात. साल पाचक आणि शक्तिवर्धक असून उकडलेल्या पानांचे पोटीस वेदनाहारक असते. ऑक्नेसी कुलाचा समावेश तेरडा गणात [⟶ जिरॅनिएलीझ] करतात; जिरॅनिएसी बाल्समिनेसी (तेरडा कुल) इ. कुलांशी त्याचे आप्तभाव आहेत.

 

लेखक: जमदाडेजवि

स्त्रोत: मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate