फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) या शास्त्रीय नावाच्या वंशातील काही जाती बागेत शोभेकरिता विशेषेकरून लावलेल्या आढळतात. एकूण जाती सु. ४० (ए.बी. रेंडेल यांच्या मते १४) असून त्यांचा प्रसार द. आणि उ. अमेरिकेतील उष्ण प्रदेशांत आहे. भारतात काही जाती बाहेरून आणून लावल्या आहेत.
बागेतील शोभा वाढविण्यासाठी अनेक संकरज प्रकार आज उपलब्ध आहेत; तथापि त्या सर्वांचा उगम अर्जेंटिनातील पिटूनियाच्या निक्टॅजिनिफ्योरा, व्हायोलॅशिया, अक्सिलॅरिस व इंटिग्रिफोलिया या जातींच्या संकरात आहे. दुहेरी पाकळ्यांचे व अनेक भडक रंगांचे आधुनिक प्रकार संकरातून व निवडीने काढले गेले आहेत. मूळच्या जाती सु. ३०-४५ सेंमी. उंच, सरळ वाढणार्या, वर्षायू (एक वर्षपर्यंत जगणार्या) ओषधी [ ® ओषधि ] असून पाने साधी, मध्यम आकारमानाची, आयत, समोरासमोर आणि खोडाच्या टोकाकडे बिनदेठाची तर बुंध्याकडे लांब देठाची, कधी सर्वच आखूड किंवा बिनदेठाची असतात.
सर्व भागांवर प्रपिंडीय (ग्रंथियुक्त) केस असतात. फुले एकेकटी, विविध रंगांची, तुतारीसारखी व कक्षास्थ (पानांच्याबगलेत) असतात; केसरदले पाच असून इतर सामान्य शारीरिक लक्षणे ð सोलॅनेसी कुलात (धोतरा कुलात) वर्णिल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड बिया अथवा दाब कलमांनी करतात. बी ऑगस्ट ते ऑक्टोबरात किंवा मैदानी प्रदेशात मार्च ते जूनमध्ये व डोंगराळ भागात मार्च ते एप्रिलमध्ये पेरतात; महिन्याने रोपे दुसरीकडे वाफ्यात (कडेने किंवा मध्ये) लावतात. दुहेरी पाकळ्यांच्या जातींची लागवड कलमांनी करतात.
लावल्यापासून तीन ते चार महिन्यांनी फुले येऊ लागतात व ती बराच काळ येत राहतात. खिडकीजवळ केलेल्या वाफ्यांत ही झाडे अधिक शोभिवंत दिसतात; कुंड्यांतूनही लावतात. पिटूनिया हायब्रिडा हा संकरज प्रकार लोकप्रिय आहे. टोमॅटो व बटाट्याजवळ ही झाडे लावू नयेत कारण उपद्रवकारक अशा कीटकांपासून त्यांना इजा पोहोचणे शक्य असते.
लेखक: जोशी, रा.ना.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
प्रिम्युलेलीझ : द्विदलिकित फुलझाडांच्या [⟶ वनस्पति...
या कुलात अनेक उपयुक्त वनस्पतींचा समावेश आहे. फळे ब...
हे इंग्रजी नाव ॲसर या शास्त्रीय नावाने ओळखल्या जा...
फुलझाडांपैकी द्विदलिकित वनस्पतींचे एक मोठे व प्रार...