फायकॉइडी कुलातील बहुतेक वनस्पती उष्ण व कोरड्या हवामानातील असल्याने त्यांचे ⇨ मरुवनस्पतींशी साम्य असते. त्या वर्षायू (एका हंगामात क्रम पूर्ण करणाऱ्या) किंवा बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) झुडपे किंवा ओषधी [→ ओषधी] असून त्यांची पाने साधी, एकाआड एक किंवा समोरासमोर, अरूंद व कधीकधी मांसल किंवा खवल्यासारखी असतात; क्वचित उपपर्णे असतात; खोडावर शेंड्याकडे किंवा पानांच्या बगलेत वल्लरीवर[→ पुष्पबंध] नियमित, द्विलिंगी फुले येतात.
फुलांत फक्त संवर्त असून संदले ४-५, सुटी किंवा जुळलेली; व कधी संख्येने अधिक आणि किंजपुटास चिकटलेली किंवा त्यापासून सुटी; केसरदले ३, ५ किंवा अनेक, अंशतः किंवा पूर्णपणे जुळलेली, ऊर्ध्वस्थ किंवा अधःस्थ किंजपुट २, ५ किंवा अनेक किंजदलांपासून बनलेला व त्यात एक किंवा अनेक कप्पे; किंजल्क २-२० व बीजके प्रत्येक कप्प्यात एक ते अनेक असून मांडणी विविध प्रकारची असते [→ फूल]. बोंड (फळ) आडवे फुटते किंवा त्यातील पडदे तुटून फुटते; बिया बहुधा अनेक आणि त्यांत पिठूळ पुष्क (गर्भाबाहेरचा अन्नांश) व त्याला वेढणारा मोठा गर्भ असतो. मृदुफळ क्वचित आढळते व फुलात बाहेरील केसरदले पाकळ्यांसारखी असतात. किंजदलांचे स्थान व बीजकांची मांडणी यांवर आधारित उपकुले बनविली आहेत. कित्येक जाती बागेत नवलपूर्णतेकरिता लावतात. न्यूझीलंड स्पिनॅक हे जेवताना कच्च्या भाजीप्रमाणे घेतात.भारतात माल्युगो, गिसेकिया, ट्रायँथेमा व सेसूव्हियम या चार वंशांतील काही जाती औषधांकरिता उपयुक्त आहेत.
(१) झरस (मॉल्युगो स्पर्ग्युला अथवा मॉ. ऑपोझिटिफोलिया) : हे मांसल क्षुप (झुडूप) कडू द्रव्ययुक्त असून बांळतपणात याची भाजी खाल्ल्यास शरीरक्रिया सुधारतात; त्वचारोगात लेप लावतात. कानदुखीत कानशिलावर लेप देतात.(७) धाप (सेसूव्हियम पोर्चुलॅकॅस्ट्रम) : मांसल, सरपटत वाढणारी ओषधी; समुद्रकिनाऱ्यावर वाळूत सामान्यतः आढळते. चांगली शिजवून व लवणांश काढून टाकून हिची भाजी करतात.
2. Rendle. A. B. The Classification of Flowering Plants, London, 1963.
३. देसाई, वा. ग. औषधीसंग्रह, मुंबई, १९७५.
लेखक-चिन्मुळगुंद, वासंती रा.
स्त्रोत -मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 6/1/2020
आर्कीयन म्हणजे प्राचीन किंवा आर्ष.
खसखस व अफूकरिता करतात.
फुलझाडांच्या ह्या वंशाचा समावेश कंपॉझिटी कुलात केल...
याचे मूलस्थान भारताचा ईशान्य भाग आहे. चीन आणि जपान...