অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कमी खर्चिक अंडी जोपासना तंत्रज्ञान

कमी खर्चिक अंडी जोपासना तंत्रज्ञान

हे मीठ लावून अंडी साठवून ठेवण्याचे साधे तंत्रज्ञान किफायती असून त्यासाठी लागणारे साहित्य स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे.

आवश्यक साहित्य

वि‍टा, हातोडी, चाळणी, साधे मीठ, पसरट भांडे आणि पाणी

पद्धत

हाताने वि‍टांची पूड करा आणि चाळून घ्या. साध्या मीठाची देखील अशीच पूड करुन घ्या आणि वि‍टांची पूड व मीठ २:१ या वजनी प्रमाणात मिसळा. त्यानंतर यामध्ये पाणी मिसळा आणि कणकेसारखा गोळा तयार करा.दुस-या चरणात अंडे साठवणुकीसाठी योग्य आहे की नाही किंवा ते आधीच उबले आहे हे ठरविले जाते. ही चाचणी साधी आहे कारण यात तुम्हाला फक्त एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात अंडे टाकायचे आहे. जर अंडे पाण्यावर तरंगले तर ते साठवणुकीसाठी योग्य नाही आणि जर ते बुडाले तर ते चांगले आहे. आता ही चांगली अंडी एका पसरट भांड्यामध्ये ठेवा आणि त्यांना विटेच्‍या कणकेसारख्या गोळ्याने झाकून टाका.

हे भांडे सावलीत दहा दिवस ठेवा, त्यावर सतत पाणी शिंपडून कणकेचा ओलावा टिकवून ठेवा. मध्यांतरात, मीठ अंड्यामध्ये शोषले जाते आणि त्यांना सुरक्षित ठेवते. दहा दिवसांनी अंडी धुवा आणि साठवून ठेवा.

फायदा

मीठ लावलेली अंडी रुचकर लागतात आणि दीड महिने टिकू शकतात.

स्त्रोत : सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रीसर्च इंस्टिट्यूट, म्हैसूर, कर्नाटक

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate