অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मातीच्या भांड्यात स्पिरुलिना शैवालाची लागवड

मातीच्या भांड्यात स्पिरुलिना शैवालाची लागवड

स्पिरुलिना (एक शैवाल)

स्पिरुलिना हे एक खाण्यायोग्य सूक्ष्म शैवाल आहे. ते बिनविषारी असते आणि त्यात भरपूर प्रथिने व जीवनसत्त्वे असतात. त्याचे वैद्यकीय मूल्य उच्च असते. ग्रामीण भागातील स्त्रियांना स्पिरुलिनाची लागवड घरच्या घरी करता यावी यासाठी कमी जागा आणि गुंतवणूक लागणारी एक साधी आणि स्वस्त पद्धत विकसित करण्यात आलेली आहे. उद्योगांसाठी ही फायदेशीर ठरू शकेल कारण वाळविलेली स्पिरुलिना चांगल्या नफ्याने विकली जाऊ शकते.

आवश्यक साहित्य

३५-४० लिटर क्षमतेची तीन मातीची मडकी/ २५ चौ.मी. मोकळी आणि संरक्षित जागा

माध्यम

बायोगॅसची मळी आणि २-३ ग्रॅम समुद्री मीठ किंवा रासायनिक माध्यम (पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट, खाण्याचा सोडा आणि मीठ) आणि शुद्ध स्पिरुलिना कल्चर.

पद्धत

  • तिन्ही मडक्यांना त्यांच्या गळ्यापर्यंत जमिनीमध्ये पुरा आणि त्यात माध्यम मिसळलेले पाणी भरा. स्पिरुलिना कल्चरसाठी बायोगॅसची मळी हे सर्वात स्वस्त पोषक माध्यम आहे.
  • माध्यमात शुद्ध स्पिरुलिनाची लहानशी मात्रा टाका. (सुरुवातीस उत्पादकाला तयार मिश्रणासाठी साठा-उपाय म्हणून पोषक माध्यम पुरविले गेले पाहिजे.)
  • माध्यम दिवसातून ३-४ वेळा ढवळावे कारण स्पिरुलिना स्थिर माध्यमामध्ये वाढू शकत नाही.
  • मडकी उन्हात ठेवावीत कारण स्पिरुलिनास पूर्णपणे वाढण्यास ३-४ दिवस लागतात.
  • पूर्ण वाढ झालेली स्पिरुलिना (जेव्हां फिकट मध्यम गडद हिरवे होते) साध्या फडक्याने गाळून घेऊन साठवून ठेवता येते.
  • ताज्या पाण्याने धुतल्यानंतर स्पिरुलिना (त्याला चिकटलेली रसायने काढून टाकण्यासाठी) थेट चपाती/ कणिक, चटण्या, नूडल्स, डाळी, भाज्या इत्यादिंमध्ये (वजनाने सुमारे २%) मिसळली जाऊ शकते. स्पिरुलिना सावलीत वाळवून साठवली जाऊ शकते. तिची गुणवत्ता आणि मूल्य टिकविण्यासाठी ती त्वरीत वाळविणे आवश्‍यक आहे.

फायदे

  • ३५-४० लिटरच्या ३ मातीच्या मडक्यांमध्ये उगविलेली स्पिरुलिना दर रोज २ ग्रॅम (दर डोकी) उच्च दर्जाची स्पिरुलिना पावडर पुरविण्यास पुरेशी आहे ज्यामुळे दररोज अ जीवनसत्त्वाची १००% आणि ब-१२ जीवनसत्त्वाची २००% गरज भागविली जाते.
  • कॉंन्‍क्रीटचे अस्तर असलेली डबकी किंवा पॉलि‍थीनचे अस्तर असलेले खड्डे यापेक्षा मडकी वापरण्यास हाताळण्यास सोपी असते.
  • मडकी तुटली तर सहज बदलता येतात आणि गरज पडल्यास दुसरीकडे हलविता देखील येतात.
  • जंतुसंसर्ग, प्रदूषण किंवा इतर काही अपघात झाला नसल्यास मडक्यांतील कल्चर दीर्घकाळ साठविता येते.
  • कमीत कमी प्रयासाने ग्रामीण स्त्रियांद्वारे आणखी जास्‍त मडकी तयार केली जाऊ शकतात.

 

स्त्रोत : AMM एएमएम मरुगप्पा चेट्टियार रीसर्च सेंटर, अल्गल डिव्हिजन, सवेरिव्यार पुरम, पुडुकोट्टाई जिल्हा, तामिळनाडु.

www.daenvis.nic.in

अंतिम सुधारित : 3/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate