अल्पसंख्याक लोकसमुहाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या न्या.सच्चर समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने दि. २१ फेब्रुवारी २००८ रोजी स्वतंत्र अल्पसंख्याक विकास विभागाची निर्मिती करण्यात आली. अधिसूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अल्पसंख्याक लोकसमुहांच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक व सांस्कृतिक अशा सर्वसमावेशक उत्कर्षासाठी तसेच अल्पसंख्याकांच्या हक्काचे संरक्षण करणे.
अल्पसंख्याक विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी नेमलेले अधिकारी (त्यांचे नाव आणि पद), त्यांचा कार्यालयाचा पत्ता, दुरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि त्यांना नमूद केलेले कार्य याविषयी माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अल्पसंख्याक विभागाशी अधिनस्त संस्था, संपर्क माहिती (पत्ता, दुरध्वनी, फॅक्स, इ-मेल पत्ता), त्या संस्थांचे उद्दिष्ट, आणि संस्थेचे अध्यक्ष व सदस्य मंडळ यांची माहिती दिलेली आहे. ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
दोन प्रकारचे अल्पसंख्याक मानले गेले आहेत.
१. धार्मिक अल्पसंख्याक - राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम १९९२ (National Commission for Minorities Act, 1992) मधील कलम २(क) नुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेले तसेच महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम २००४ मधील कलम २ (ड) नुसार खालील सहा समुदाय अल्पसंख्याक लोकसमूह घोषित केले आहेत. ते ६ समुदाय म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौध्द, पारशी आणि जैन हे होत
२. भाषिक अल्पसंख्याक - भारतातील राज्यामध्ये राज्यभाषेव्यतिरिक्त इतर भाषा मातृभाषा असलेल्या लोकसमूहाला भाषिक अल्पसंख्याक म्हणून गणण्यात येते. त्यामुळे भाषिक अल्पसंख्याक समुदाय प्रत्येक राज्यात भिन्न असेल. महाराष्ट्रामध्ये मराठी व्यतिरिक्त अन्य भाषा मातृभाषा असणाऱ्या लोकसमूहाला भाषिक अल्पसंख्याक गणण्यात येते.
वैयक्तिक अल्पसंख्याक प्रमाणपत्राबाबत – महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही व्यक्तीस धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत नाही. अल्पसंख्याकाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याच्या दाखल्यामधील नोंद ग्राह्य धरण्यात येते. जर अशा प्रकारची नोंद शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये नसेल तर धर्म / भाषा याबाबतचे स्वयंघोषित शपथपत्र (Notarized Affidavit) अल्पसंख्याक असल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. याबाबत शासन निर्णय क्र.-अविवि-2010/प्र.क्र.109/10/काया-5 दि. 01 जुलै 2013 पहावा. शासन निर्णयासाठी इथे क्लिक करा
अंतिम सुधारित : 1/30/2020