भारत सरकारच्या कौशल्य आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने मुंबईतील दादर येथे ''रिजनल व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्युट फॉर वुमन'' ही संस्था चालविण्यात येते. महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करणे, या हेतुने संस्थेच्या वतीने विविध कौशल्य विकास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. हे अभ्यासक्रम ऑगस्ट 2016 पासून सुरु होतील. या सर्व अभ्यासक्रमांसाठी उमेदवार हा दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अभ्यासक्रमांचे नाव, जागेची संख्या, कालावधी इत्यादी माहिती अशी :
अ.क्र. | अभ्यासक्रमांचे नाव | जागेची संख्या | कालावधी |
---|---|---|---|
१. | कॉम्प्युटर ऑपरेटर ॲण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट | ४० | 1 वर्ष |
२. | ड्रेस मेकिंग | २० |
1 वर्ष |
३. | सेक्रेटेरियल प्रॅक्टीस (इंग्लिश) | २० |
1 वर्ष |
४. |
बेसिक कॉस्मेटॉलॉजी | २० |
1 वर्ष |
५. |
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर | २० |
1 वर्ष |
६. | आर्किटेक्चरल ड्राफ्टसमनशिप | ४० | २ वर्ष |
७. | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | ४० | २ वर्ष |
या अभ्यासक्रमांसाठी 150 रुपये दरमहा शुल्क असून अनुसूचित जाती-जमातीच्या उमेदवारांसाठी हे शुल्क 50 रुपये इतके आहे. तसेच अनुसूचित जाती व जमातीसाठी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी, सेना दलातील सैनिकांच्या विधवांसाठी, पाल्यांसाठी शासनाच्या नियमानुसार आरक्षण उपलब्ध आहे.
या अभ्यासक्रमांचे अर्ज आणि अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संस्थेच्या www.dget.nic.in किंवा rvtimumbai.ac.in या संकेतस्थळास भेट द्यावी.
संस्थेचा पत्ता :
रिजनल व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्युट फॉर वुमन,
काशिनाथ धुरु मार्ग, दादर (प), मुंबई – 400 028
दूरध्वनी क्र. – 022-24223962
- देवेंद्र भुजबळ,
संचालक (माहिती)(प्रशासन)
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 3/27/2020
डीओलॉजी वैद्यक शास्त्रातील महत्वाची शाखा आहे. रोगन...
भाषा हे संपर्काचे महत्त्वाचे माध्यम आहे. भाषेवर प्...
दहावी-बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना 'क...
मानवाच्या जगण्यामध्ये कला, संस्कृती, साहित्य, विज्...