অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एकीतून सामाजिक जबाबदारी

एकीतून सामाजिक जबाबदारी

विदर्भातील यवतमाळ जिल्‍हयामधील कळंब तालुक्‍यामध्‍ये गांधीनगर हे एक छोटेसे गांव वसलेले आहे. यवतमाळ शहरापासून साधारण ३५  कि. मी. अंतरावर हे गांव आहे. यामध्‍ये 3 संवर्गातील (एससी, एसटी, ओबीसी) लोक राहतात.  प्रमुख व्‍यावसाय शेती आणि मजुरी. शिक्षणाचे प्रमाण कमी आहे.

सन 2011 मध्‍ये या गावांत बीसीआय कार्यक्रम सुरु करण्‍यात आला. हा कार्यक्रम समजुन घेण्‍यासाठी गावातील सदस्‍यांना बराच वेळ लागला. पुर्णपणे कार्यक्रम समजल्‍यानंतर गांधीनगरमध्‍ये शेतक-यांचे 3 गट पाडण्‍यात आले. एका गटात साधारण ३५  ते ४० सदस्‍य आहेत. प्रत्‍येक ग्रुप कार्यक्रम समजुन घेण्‍यासाठी संबधीत अधिका-याचे मार्गदर्शन घेवु लागले व वेळोवळी आपली मिटींग स्‍वता एकत्र जमुन घेवु लागले. या मिटींगमध्‍ये त्‍यांच्‍या विचारांची देवाण घेवाण होत असत. त्यांच्यातीलच एका ग्रुप मधील एक सदस्‍य श्री शंकर गुरकुटे याचा मुलगा कार्तिक शंकर गुरकुटे अचानक आजारी झाला. आजाराचे निरसन होवु शकले नाही. तो मुलगा ९ वी च्‍या वर्गात कळंब येथील आश्रम शाळेत शिकत आहे. आजाराचे प्रमाण खुप वाढले. जिल्‍हयाच्‍या ठिकाणी नेण्‍यासाठी त्‍याच्‍या वडिलांकडे पैसे नव्‍हते.

आजाराचे प्रमाण तर जास्‍त होत होते. नंतर ग्रुपमधील काही सदस्‍यांना ही गोष्‍ट समजल्‍यानंतर सध्‍यांकाळी लगेच त्यांच्या ग्रुपमधील सर्व सदस्‍य एकत्र जमले. या आजारावरती सविस्‍तर चर्चा करुन निर्णय घेण्‍यात आला. प्रत्‍येक सदस्‍यांनी एैपतीप्रमाणे कोणी १००, कोणी १५० तर कोणी २००  रुपये जमा करुन एकुण १०,४५० रुपये जमा झाले. ही जबाबदारी ग्रुपमधील टीम लिडरकडे देण्‍यात आली. लगेचच दुस-या दिवशी यवतमाळ मधील चांगल्‍या दवाखान्‍यामध्‍ये मुलाला भरती करण्‍यात आले. ८ दिवसांनतर मुलाचा आजार काही प्रमाणात कमी झाला. १५  दिवसांनतर मुलगा पुर्णपणे व्‍यवस्थित बरा झाला.

मुलाच्‍या चेह-यावरचा आनंद पाहुन  वडिलांनी त्‍यास शिक्षणासाठी पुन्‍हा शाळेत पाठविले. व दुस-या महिन्‍यात विजयादशमीच्‍या दिवशी प्रत्‍येक सदस्‍याच्‍या घरी जावुन अशिर्वाद घेतला व पुढे चालुन मी खुप चांगले शिक्षण करुन माझ्या शिक्षणाचा उपयोग मी माझ्या गावासाठीच करेन असा संकल्प केला.

लेखनः यशंवत कृष्‍णा कडाळी

अंतिम सुधारित : 3/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate