सुदंरवाडी हि अतिशय दुर्गम डोंगरकपारीत व औरंगाबाद पासुन सुमारे 55 कि.मी. अंतरावर वसलेली बंजारा समाजाची, साधारण 65 घरे व ४५८ लोकसंख्या असलेली एक वाडी आहे. वाडीची परिस्थिती अतिशय बिकट जेथे जाण्यासाठी साधा रस्तासुध्दा नाही. त्यामुळे शासनाच्या अनेक योजनेपासुन ही वाडी वंचीत आहे. अर्ध अधिक लोकांना बाजारपेठेच्या गावांत 10 ते 12 कि.मी. पायी जावे लागते. त्यांचा मुख्य व्यवसाय शेती. ती ही पुर्ण पावसाच्या पाण्यावर अवलंबुन.
डोंगर उतारावर जो पाउस पडेल त्याचे पाणी ही थांबत नव्हते. पिण्यासाठी पाणी दुरापास्त् येथे पिकांना कुठुन मिळणार यासर्व परिथितीमुळे कुटंबासाठी धान्य मिळविणे दुर्लभ म्हणुन दरवर्षी सगळया वाडीचे उस तोडीसाठी स्थलांतर होत असे. घरी फक्त वयस्कर व शाळकरी मुले राहात. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे व आरोग्याकडे दुर्लक्ष होत होते. त्यामुळे बहूतेक लोक अशिक्षीत किंवा कमी शिकलेले. नियमित आर्थिक चणचण, दोनवेळच्या अन्नाची भ्रांत, शाळा लांब होती. शिक्षणाचे महत्व असूनही परिस्थितीमुळे काही करता येत नव्हते.
या परिस्थितीवर मात करण्यासाठी वॉटरशेड ऑरगनायझेशन ट्रस्ट व सीड संस्थेने ग्रामस्थांना मदतीचा हात पुढे केला. सप्टेंबर 2005 मध्ये गावक-यांमध्ये जनजागृती करुन काही अटी टाकल्या उदा. दारुबंदी, कु-हाडबंदी, लोकसहभाग, श्रमदान त्यास ग्रामस्थांनी होकार देताच संस्थेने विविध विकासाची कामे हाती घेतले. जाणीव जागृती व एकजुटीसाठी प्रथम गावक-यांकडुन चार श्रमदान करुन घेतले. त्यानंतर तांडयाचा अभ्यास करण्यासाठी लोक सहभागीय ग्रामिण अध्ययन केले.
वाडीत ५ स्वयंसहाय गटाची स्थापना, तरुण मंडळ, शेतकरी मंडळ इत्यादी स्थापन करण्यात आले. विविध प्रशिक्षण्, अभ्यास सहल, कार्यशाळा, बैठका व नियमित ग्रामसभा अशा विविध माध्यमातुन ग्रामस्थांमध्ये जागृकता निर्माण झाली. वाडीतील समस्या जाणुन घेण्यासाठी तार्किक आराखडा तयार करण्यात आला. सर्व कुटुंबाची सांपत्तीक वर्गवारी तयार करुन क्षेत्रिय व सामाजिक महिला विकास कामासाठी गावस्तरावर विविध विकास समित्या तयार करुन त्यांना प्रशिक्षण व कार्यशाळा घेण्यात आल्या.
या कार्यक्रमांअतर्गत तांडयामध्ये एकुण ५१,२८,८७१/- रुपये खर्च झाला असून ३७२.९२ हेक्टर क्षेत्रावर काम झाले आहे. याचा लाभ सर्व सुंदरवाडीतील लोकांना झाला. त्यात शेतीची बांध बंदिस्ती, मातीचे नालाबांध, सिमेंटबंधारा, दगडी बा्ंध्, सलग समपातळी चर, जल शोषकचर, वणीकरण ईत्यादी उपचार केले. त्यामुळे या क्षेत्रातील पाणी त्याच क्षेत्रात राहीले. याचा परिणाम म्हणजे सभेावतालच्या विहिरीची पाणी पातळी वाढली.
वाहुन जाणारे पाणी व माती थांबली. जमिन सुपिक झाल्या असुन बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. जिथे खरिपाचे पिक निघत नव्हते तिथे सर्व शेतकरी चांगल्या उत्पन्न घेत असून काही शेतकरी रब्बीचे पिक घेत आहे. यावाडी मध्ये पुर्वी हिवाळयात व उन्हाळयात भाजीपाला भेटणे दुरापास्त होते. तेथे या कामामुळे काही शेतकरी भाजीपाला पिकवून जवळच्या आठवडी बाजार किंवा औरंगाबाद येथे विक्रीसाठी आणतात. यावाडीत कांदयाचे उत्पादन तिपटीने वाढल्याने येथील शेतकरी आपला कांदा नागपुरच्या बाजारपेठात नेतात. डेांगरउताराची जमिन असुनही या कार्यक्रमातुन काही शेतक-यांनी फळबागाची लागवड करुन त्यांची जोपासना केली.
शेतीच्या उत्पन्नात भरपुर वाढ झाल्याने त्यांच्या राहाणीमानात बदल झाला. सर्व लोक मुलांना चांगले शिक्षण देत असून मुलांच्या प्रगतीकडे कुटुंब स्वता लक्ष देत आहे. यामुळे युवक व विद्यार्थिंनीची सहभाग वाढलेला आहे.
पाणलोट व्यवस्थापनाचे कामे झालेले आहे. परंतु यावर्षी दुष्काळाची झळ मात्र सुंदरवाडी करांना बसत असूनही शासनाचे त्यांच्याकडे लक्ष नाही. तेंव्हा त्यांनी परत सीड संस्थेची मदत घेतली. वाढत्या प्रदुषनामुळे हवामानात बदल झाला असून त्यानुसार शेतक-यांनी बदलले पाहिजे.
या उक्तीची अंमलबजावणी या छोटयाशा वाडीत डोळस पणाने ग्रामस्थांनी सुरु केली आहे. संस्थेच्या वतीनी परिसराचा आनंद घेवून हवामान केंद्र बसविले असून याचा शेतक-यांना फायदा होत असून यामुळे त्यांना दररोज वातावरणातील उष्णता, आर्दता, वा-याचा वेग याचा अंदाज येत आहे. यानुसार कृषी तंज्ञाच्या मार्गदर्शनाने हे पत्रक शेतक-यांसाठी उपलब्ध केल्यामुळे शेतीची नियोजन करण्यात मदत होत आहे.
पाणलोट क्षेत्र विकासाचे काम होवून ही या वर्षी गावांत पाणी नाही. याचे कारण गावक-यांनी शेाधन्याचा प्रयत्न केला व त्यावर उपाय करण्यासाठी त्यांनी पाणी व्यवस्थापनाचे नियोजन सुरु केले आहे. क्षेत्रिय उपचारामुळे शिवाराची बांधणी होवून पाणी आडले आहे. हे सत्य असले तरीही उपलब्ध पाण्याचे नियोजन त्यांनी प्रभावी केले नव्हते. यामुळे त्यांनी सध्या जे पाणी वाडीत उपलब्ध आहे त्यासाठी पाण्याचा ताळेबंद केला. शिवारातील पशुपक्षी, खाजगी पशुधन, पिण्याचे पाणी याचे नियोजन केले असून शेतक-यांकडे पाणी उपलब्ध आहे.
त्यांनी पाणी व्यवस्थापनासाठी 34 शेततळे तयार केलेले असून त्या पाण्याचा वापर ठिबक किंवा तुषार सिंचनाच्या साहयाने करणार आहे. पाण्याचा एकही थेंब वाया जावू नये हाच उददेश् त्यामागे असून जुने सिमेंट बंधा-याची दुरुस्ती केली. यासोबतच घरामध्ये पाण्याचे नियोजन केले आहे. सध्या या दुष्काळात लावलेल्या बदामाच्या झाडाच्या वाढीसाठी धुणे व भांडयाचे पाणी टाकत आहे. यासाठी सर्व गावकरी एकत्र बसून निर्णय घेतात. आपल्या शिवारातील पाणी शिवारातच कसे राहिल त्यासाठी त्यांनी वृक्ष वल्ली आम्हा सोयरे या म्हणी नुसार येथील गावक-यांनी वनसंवर्धन केले. मागील तीन वर्षाचे सर्व झाडे चांगली आहेत.
पाणी व्यवस्थापनासोबत रासायनिक व हायब्रिड बियाणे फवारणी यासर्व गोष्टींमुळे जमिनीचा पोत खालवत चालला असल्यामुळे जमिनिचा पोत सुधारण्यासाठी गांडुळखत, सेंद्रियखत, अमृतपाणी फवारणी साठी वापरत आहे. पर्यावरण संवर्धन करण्यासाठी लहान मुलांपासून वयोवृध्दापर्यंत सर्वांचा मोठा सहभाग असतो.
सुंदरवाडीकर आपल्या गावापुरतेच विकासाचे काम करत नसून त्यांनी सुदंर नगदेश्वर नाटय मंडळ तयार केलेले असून त्यामध्ये संगीत भारुडे, छोटयाछोटया नाटिकाच्या माध्यमातुन हवामानाच्या बदलाची कारणे व परिणाम, पाणी व्यवस्थापन, जंगल व जैविक विविधतेचे संवर्धन जमिनीची पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय शेतीचे महत्व सांगितले असून त्यांनी जालना जिल्हयातील 10 गावांमध्ये जाणीव जागृतीचा कार्यक्रम हाती घेतला असुन सध्या ही कामे चालु आहे.
खरोखरच सुंदरवाडी नावांप्रमाणेच सुंदर होत आहे. परंतु ती आपल्या पर्यावरण विकासाचा वसा इतर गावांनाही वाटत चालली आहे.
लेखनः अशोक राठोड
अंतिम सुधारित : 12/14/2019
एखाद्या शहरांतील रस्त्यावर राहणार्या मुलांचा उल्...
ग्रामसभेचे अधिकार मुंबई ग्रामपंचायत [सुधारणा] अधिन...
सरकारने 4882 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय अन्न सुरक्...
आधुनिकत्व (मॉडर्निटी) म्हणजे तीन महत्त्वाच्या बाबत...