অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निजामकालीन वास्तूचे जतन व नूतनीकरण

निजामकालीन वास्तूचे जतन व नूतनीकरण

निजामकालीन वास्तूचे जतन व नूतनीकरण
बसलासाहेब कच्छवे सरांची कामगिरी 

जिल्हा  परिषद मुलांचे मल्टीपर्पज हायस्कूल नांदेड . ही निजामकालीन मराठवाड्यातील दुसऱ्या क्रमांकाची शाळा .म्हणजेच जुनी उर्दू माध्यमाची ‘मदरसे फोकानिया’ होय. या शाळेचे   बांधकाम १९०२ साली सुरु होऊन  १९१० साली पूर्ण झालेले होते.  नांदेड शहरातील सर्वात जुनी वास्तू असलेली ही शाळा. वजिराबाद भागात आज कायाकल्प  होऊन दिमाखात उभी आहे.

या शाळेने, अनेक मान्यवर विद्यार्थी घडविले. राज्याचे माजी  शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम ,माजी आमदार व स्वातंत्र्य सेनानी व माजी दिवंगत साहेबराव देशमुख बारडकर याच शाळेचे विद्यार्थी  . अनेक अधिकारी व  उच्चपदस्थ व्यक्तिमत्त्वे या शाळेने दिली आहेत.जुन्या अभ्यसक्रमात महत्त्वमापन हे गणिताचे  पुस्तक लिहिणारे गणितज्ञ प्रतापराव हयातनगरकर या  शाळेच्या सुवर्णकाळात  मुख्याध्यापक होते.

कालचक्र फिरत गेले .अनेक खासगी संस्थाच्या मराठी /  ,इंगजी शाळा त्यांच्या भव्य इमारती आणि आणि महाविद्यालये  नावारूपाला आल्या.  ही शाळा  उपेक्षित राहिली. निजाम काळात १९१० साली अत्याधुनिक सुविधासह अस्तित्वात आलेली  ही ऐतिहासिक वस्तू   अलीकडच्या काळात  धर्मशाळा बनली होती . आवारभिंत नसल्याने अतिक्रमणाचा विळखा पडला .शाळेच्या इमारतीचा गैरवापर सुरु झाला .शाळेच्या आवारात दररोज दारूच्या बाटल्या.तर  कधी वापरून फेकलेले कंडोम, सापडू लागले. अनेक प्रकारच्या  डोकेदुखी वाढल्या मुख्याध्यापकांना त्या  सांगताही येत नव्हत्या  आणि सहनही  होत नव्हत्या .

शेवटी जिल्हा परिषदेची ही  शाळा होती .ती सुधारायला स्वत: होऊन कोणीच पुढाकार घेत  नव्हते  .आणि  सुधारायचा प्रयत्न केलाच तर  “तुम्हाला कोणी राष्ट्रपती पुरस्कार देणार नाही’ असे म्हणून अधिकारी चाकोरी मोडू देत नव्हते. हे सर्व याच शाळेचे शिक्षक बालासाहेब कच्छवे उघड्या डोळ्यांनी अनेकवर्षे बघत राहिले .योगायोगाने त्यांना पदोन्नती मिळाली .ते या शाळेचे  मुख्याध्यापक  झाले. याच काळात शालेय शिक्षणाबद्दल प्रचंड आस्था असलेले अभिमन्यू काळे हे जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आले होते. मेंदूची व्यायामशाळा  काढून   , मुलांना दीडशे पर्यंत पाढे तयार करायला शिकविणे .असे अनेक उपक्रम राबविणारे  बालासाहेब कच्छवे सर ,हे अभिमन्यू काळे  यांच्या गळ्यातील ताईत बनले होते.

एके दिवशी  सीइओ अभिमन्यू काळे   यांनी या शाळेला भेट दिली. त्या भेटीत  मुख्याध्यापक बालासाहेब कच्छवे यांनी शाळेची दुखणी सांगितली .काळे म्हणाले ‘‘बालासाहेब तुम्ही जिल्हा परिषदेचे पाट्या टाकणारे शिक्षक नाहीत .तुम्हीच हे सारे बदलू शकता,अडचण आली तर मी आहेच, कामाला लागा”

त्याच दिवशी  या शाळेचा कायाकल्प करण्याचा संकल्प बालासाहेबांनी   सोडला  .

म. गांधी जयंतीचा मुहूर्त साधून २  अक्टोबर २०१६ ते १२ जानेवारी २०१७ या शंभर दिवसांत हा ‘कायाकल्प’  प्रकल्प  सिद्धीस गेला.त्याचीच ही कहाणी ....

जुन्या ऐतिहासिक वस्तूचे जतन करायचे तरी  कसे हा प्रश्न होता.

यासाठी अर्कालॉजी   विषयाचे तज्ञ व अभ्यासक सुरेश जोंधळे यांना पाचारण करण्यात आले.त्यांच्या सल्ल्यानुसार जुने सर्व टिकवून त्याचाच कायाकल्प करायचे ठरले.

कमीत कमी वेळात जस्तीत जास्त काम कसे करायचे यासाठी जेंव्हाच्या तेंव्हा ,जिथल्या तिथे हे जपानी  ‘कायझेन’ तंत्र वापरायचे ठरले. (हे तंत्र कार्पोरेट क्षेत्रात वापरता.कमी  वेळात अधिक क्वलीटीचे काम केले जाते.)

शाळेच्या संपूर्ण इमारतीचे रंग उडालेले होते. मौल्यवान सागवानी दरवाजे ,खिडक्या ,१२ कपाटं ,फर्निचर अगदी जुनाट दिसत होते.मोडकळीस आलेले होते.यांना पॉलिश करून चकाचक करायचे ठरले. त्यासाठी कुशल  कारागीरांच्या  तीन जोड्या निवडल्या.त्यांना जागेवरच रोज दोन वेळा जेवण ,चहा व दोन दिवसाला मजुरी देण्याचे ठरले .तुम्ही मोठे देशाचे काम करीत आहत असे समजून दिल्याने, त्यांनी  दिवसरात्र काम करून ३९ दिवसांत हे काम पूर्ण केले .

शाळेच्या आवारात एक नादुरुस्त बोर होता व पिण्याचा पण्याचा मोठा हौद होता. बोर आटल्याने कोणालाच पिण्यासाठी पाणी नव्हते.दुरुस्तीला कुठलाच निधी नव्हता. आधीच्या मुख्याध्यापकानी दुष्काळाचे कारण सांगून बोरची  दुरुस्ती टाळली होती.

...आणि ठिणगी पेटली

एक दिवस कच्छवे सर शाळेपुढील   हाटेलजवळ उभे होते.त्यांच्याच शाळेच्या मुली हाटेल मालकास पिण्यासाठी पाणी मागत होत्या .हाटेल मालक तर पणी देतच  नव्हता पण मुलीना घाणेरडे बोलत होता. हे बघून कच्छवे सरांच्या मनात ठिणगी पेटली.लगेच  कच्छवे सरांनी शाळेतील सर्व शिक्षकांना चहापानासाठी आमंत्रित केले.आणि पाणी समस्या सोडवायची हा निर्धार जाहीर केला . या कामासाठी   स्वत:चे अकरा हजार रुपये जाहीर  केले   सर्व शिक्षकांनी मिळून आठ हजार रुपये  जमा केले . रीबोर होताच बोरला साडेतीन  इंची पाणी लागले. आणि पाणी समस्या सुटली . वाटर  फिल्टर मशीन बसवून सर्वाना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध केले आहे.

अतिशय घाणेरडी झालेली शाळेची ही वस्तू ,’नियमितता आणि निर्मलाता’ हे सूत्र वापरून स्वच्छ केली गेली .या  स्वच्छतेसाठी मेड इन जर्मनी चे वॉटरगन वापरले. परिणामी ११० वर्षाचा मळ आणि धूळ कमी वेळात स्वच्छ झाली.

मुख्याध्यापकांच्या कक्षात निजामकालीन तिजोरी होती पण तिचे कपाट उघडत नव्हते आणि चाव्याही मिळत नव्हत्या आता ती दुरुस्त झाली आहे.

या शाळेची १९३० सालची जूनी  लायब्ररी होती. पुस्तके ठेवायची १२ कपाटे होती पण ग्रंथांची व कपाटांची  अवस्था गलितगात्र होती. कारागीरांच्या साह्याने त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. .पुस्तकांच्या १२ कपाटांना चाके बसवून स्थिर लायब्ररीचे रुपांतर   ‘मोबाईल लायब्ररी’ केली आहे. जुने लाकडी फळे ,लाकडी फाळ्या यांच्या पासून सोफासेट बनविण्यात आले. वेस्ट मटेरियल अर्थात जुन्या स्क्राप मधून  तीन फुटी आणि आठरा फुटी अशा दोन शिड्या बनवण्यात आल्या आहेत.

या शाळेतील भंगारात  अनेक दिवसांची साचलेली रद्दी ,व भरपूर स्क्राप मटेरियल  निघाले  हा कचरा मागील आठ महिने  शालेय पोषण आहार बनवायला वापरला जात  आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरचा खर्च कमी झालाआहे.

शाळेच्या आवारात गच्चीवर  कोणीही घुसायचे ,मवाली गुंड रात्री या पवित्र इमारतीचा वापर, वाईट कमासाठी करायचे .कच्छवे सरांनी आवर भिंती बांधून घेतल्या व आवारात साचलेल्या  दारूच्या बाटल्या फोडून या भिंतीवर काचा लावल्या .त्यामुळे शाळा सुरक्षित झाली आहे. या भागात आता सुंदर  बागकाम  केले आहे.व शालेय पोषण आहाराची  कोठी व  स्वयंपाकघर निर्माण केले आहे.

शाळेत कोण आले, कोण गेले,हे बघण्यासाठी  सी सी टीव्ही  कॅमेरे बसविले आहेत. प्रत्येक वर्गात कायचालू आहे हे मुख्यध्यापक आपल्या कार्यालयात बसून बघू ऐकू शकतात.सूचना देऊ शकतात.  शिक्षकांसाठी  नवीन बायोमेट्रिक अॅडेंटी कार्ड वापरले जाते. या  इलेक्ट्रोनिक कार्डची  जाता येताना  कॅमेरे नोंद घेतात . शिक्षक आल्या  गेल्याची नोंद ठेवतात .

याच शाळेत नांदेड जिल्ह्यातील सर्व  जिल्हापरिष शिक्षकांचे ६८०० सर्व्हिस बुक ठेवण्यात आलेले होते. ते घेण्यासाठी  या शाळेत रोजच अनेक शिक्षक येत असत .त्यांचा शाळेला कायम स्वरूपी अडथला होत असे .कच्छवे सरांनी आता शाळेच्या परिसरात अद्ययावत रेकार्ड रूम तयार केले आहे.त्यामुळे हवे ते कागदपत्र आणि सर्व्हिस बुक काही मिनिटात मिळतात .

हे सर्व करायाल किती खर्च आल तो कसा उपलब्ध झाला? असे विचारले असता कच्छवे सर म्हणाले ,

याच शाळेत निजाम काळापासून हवामानाच्या  नोंदी घेणारी यंत्रणा बसविलेली आहे.जलमापिका ,आर्द्रतामापिका ,वायुवेगमापिका दिशादर्शक कुकुट यंत्र यावर रोज नोंदी होतात  येथील  हायड्रोमेट्रिक टेबल रेकॉर्ड दररोज उपगृहामार्फत नोंदविले जाते.एस.आय.ए. लंडन या कंपनीचे १९३१ साली बसविलेले वायूदाबमापक यंत्र आजही कार्यरत  आहे.

आज ह्या शाळेची वस्तू रंगरंगोटी करून दिमाखात उभी  आहे. अतिशय कमी खर्चात आणि कमी  वेळात जुन्या वस्तूचा  कायाकल्प झाला आहे.

​या कामत शिक्षणाधिकारी ,मुख्य कार्यकारी अधिकारी आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन झाले आहे. ​

हा खर्च कसा केला याबद्दल सांगताना कच्छवे सर म्हणाले , काही खर्च मी केला आहे साचलेली रद्दी विकून २६ हजार रुपये आले आता पर्यंत   अडीच लाखाचा खर्च झाला आहे.त्यातील मोठा वाटा  माजी विद्यार्थ्यांनी उचलला आहे. औरंगाबाद येथे या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे गेटटुगेदर घेतले होते.त्यांनी या शाळेच्या कायाकल्प प्रकल्पाला  मोठी मदत करण्याचे मान्य केले आहे. भविष्यात भौतिक  सुविधा सोबतच शैक्षणिक सुविधा उपलब्ध केल्या जातील .यात मेंदूची व्यायामशाळा ,विविध भाषांचे प्रशिक्षण , विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.

​बालासाहेब  कच्छवे सर ​9371261500

लेखक - सु. मा. कुळकर्णी
म.टा.प्रतिनिधी,नांदेड.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate