অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

परितक्त्या, विधवा महिलांची यशोगाथा - सुवर्णा किन्हेकर

परितक्त्या, विधवा महिलांची यशोगाथा - सुवर्णा किन्हेकर

"तमसो मा ज्योतिर्गमय"

परितक्त्या, विधवा महिलांची यशोगाथा

गाव-शरद, ता.कळब जि.यवतमाळ

सुवर्णा किन्हेकर

अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे नेहमीच म्हटले जाते.परंतु त्यासाठी गरज असते ती कठोर मेहनत, प्रयत्न आणि आणि प्रतिक्षेची! जीवनात यशस्वी होण्यासाठी योग्य दृष्टिकोनठेवणे आवश्यक आहे. कारण तोच नसेल तर सारे काही व्यर्थ आहे. होय, याची प्रचीती मला स्व:तला आली आहे आणि याचे सर्व श्रेय जाते ते केवळ वोत्र संस्थेला.

मी सुवर्णा किन्हेकर यवतमाळ जिल्ह्यातील कळंब या छोट्या गावातील रहिवासी आहे. मी, माझा पती, २ मुले आणि सासूबाई अस छोटस आमच कुटुंब. पण नियतीने आमच्या कुटुंबावर अशी वेळ आणली कि क्षणार्थात होत्याचे नव्हते झाले. आम्ही शेतमजूर दुस-याच्या शेतावर जाऊन काम करायचे आणि आपले कुटुंब चालवायचे. परंतु मागील ३-४ वर्षांपासून पावसाने पाठ फिरवली, काम मिळेनासे झाले. अशातच माझे पती आजाराशी झगडत होते. पतीच्या आजारपणामध्ये घरातील जी काही पुंजी होती ती पूर्णपणे संपून गेली होती. प्रयत्न करूनही हाती यश आले नाही आणि पतीचे निधन झाले, आणि माझ्या कुटुंबाची परवड सुरु झाली. घरची जबाबदारी माझ्यावरच असल्याने मी कोलमडून पडले.

मुलांचे संगोपन स्वस्थ बसू देत नव्हते मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालू होता, आयुष्यात नक्कीच काहीतरी चांगले होईल या बद्दल आशावाद पक्का होता, परमेश्वर दयाळू आहे असा पूर्ण विशास होता. अशाप्रकारे काम करून कुटुंबाची जबाबदारी पेलत आयुष जगणे चालू होते. आशावाद संपलेला नव्हता, आणि खरोखरच परमेश्वराच्या रूपाने वोत्र संस्था मदतीला धावून आली.. सन २०१३ मधील घटना WOTRचे अधिकारी गावात आले.

विधवा तसेच परितक्त्या महिलांची माहिती घेत घरी आले, कुटुंबातील प्रत्येक बारीक सारीक माहिती विचारात होते. आयुष्यात प्रथमच आपली कोणतरी प्रेमाने, आपुलकीने  चौकशी करत असल्याचे जाणवले आणि जगात परमेश्वर असल्याची खात्री झाली. माहिती सांगत असताना कधी अश्रुना वाट मिळाली हे समजलेच नाही. घडलेल्या घटनाचा क्रम आपोआप उलगडत होता मन पूर्णपणे रिकामे झाले.

आज मी ज्या स्थानावर आहे हि एका दिवसाची, आठवडयाची, महिन्यांची तपश्चर्या नसून यामध्ये काही वर्ष गेलीली आहेत.एखाद्या अपयशाने खचून न जाता नवनवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला,प्रत्येक अडचणींवर शांतपणे विचार करून तोडगा काढला तर यश निश्चित मिळतेच आणि पुन्हा यशाची खात्रीही असते. प्रतिक्षा करण्याची तयारी असलेल्या व्यक्तींमध्ये ‘सहनशीलता’ हा सद्गुण आढळतो. आणि हा गुण त्यांना नुसता व्यावहारिक जीवनात नाही तर कौटुंबिक, सामाजिक अशा सर्वच ठिकाणी उपयोगी पडतो. यशाला सहनशीलतेची जोड असली कि यश अधिकच खुलून दिसते! कोणत्याही कामाला हलके समजू नका. ते करताना लाजू नका. कदाचित तेच काम तुमच्या आयुष्याची दिशा ठरवेल. कोणती व्यक्ती कधी कामी येईल सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाशी चांगले संबंध फायदेशीरच ठरतात. तुमच्यासाठी कोण कधी देवदूत बनेल हे देवालाही सांगता येणार नाही. त्यामुळे मैत्रीपूर्ण संबंध अनेकदा आपल्याला यशाकडे घेऊन जातात.

हा सर्व आत्मविश्वास माझ्यामध्ये आला तो केवळ डॉ.मनीषामॅडम व मिरीकरसरांनी केलेल्या मोलाच्या  मार्गदर्शनामुळे. आम्हलाWOTR चे अधिकारी यांनी कार्यशाळा घेउन आत्मदर्शन तसेच सुखकर जीवन जगण्यासाठी आमचे मन खंबीर करत होते. आत्मविश्वास म्हणजे स्वत:कडे सकारात्मक विचाराने पहाणे. असा विचार जग बदलून टाकू शकतात. स्वत:च्या विचारावर, कृतीवर ध्येयावर, कर्तुत्वावर असणारा अमर्याद विश्वास म्हणजे आत्मविश्वास. घडून गेलेल्या घटनांची खंत न करता येणा-या भविष्यासाठी वर्तमानाचे सोने करणे.आपण करत असलेल्या कार्याचा उद्देश व परिणाम याच्या पूर्ण जाणीवेने प्रयत्न करणे म्हणजे आत्मविश्वास.WOTR च्या अधिका-यांकडून हा अनमोल ठेवा आम्हला मिळाला. नेहमीसारखाच तो दिवस होता पण आमच्यासाठी तो दिवस आशेचा किरण घेवून आला होता. आम्ही आमचा आत्मविश्वास हरवून बसलो होतो तो पुन्हा आम्हला मिळाला आणि सुरु झाली आमची जगण्याची धडपड.

परंतु नेमके काय करायचे, कोणता व्यवसाय करावा, व्यवसाय कसा असतो याची किंचितदेखील कल्पना नव्हती. याही शंकाचे निरसन श्री मिरीकर सरांनी केले. नंतर झालेल्या कार्यशाळेत श्री मिरीकर सरांनी आम्हला खूप सहज सोप्या भाषेत व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले. आमच्या गावात कोणत्या सुविधा आहेत, गावात कशाची गरज आहे, तसेच उपलब्ध साधन सामुग्रीचा कश्याप्रकारे उपयोग करून घेता येईल या विषयावर आमच्यासोबत चर्चा केली.आमच्या गावात लेडीज टेलरची संख्या कमी असल्याने पटकन माझ्या डोक्यात शिलाई मशीन घेण्याचा विचार आला आणि मी त्या विषयावर मिरीकर सरांसोबत चर्चा केली सरांनीही याला अनुमोदन दिले.

तसा प्रस्ताव तयार करून श्री मिरीकरसरांनी रुपये- ९०००/-चे कर्ज व्यवसाय सुरु करण्यासाठी दिले आणि ख-या अर्थाने आयुष्यास कलाटणी मिळाली. व्यवसाय प्रत्यक्षात सुरु केल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला. माझ्या मुली, सासूबाई इतर शेजारी सर्व कौतुक करू लागले. या कामी WOTR चे अधिकारी श्री कोरडे वश्री विनोद काटलाम मार्गदर्शन करीत असत. व्यवसाय सुरळीतपणे चालू होता. व्यवसायातून दोन पैशाची मिळकत होऊ लागल्याने कर्जाची परतफेड वेळेवर करू लागली. संसाराचा गाडा ओढत असतानी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देत होते आज माझी मोठी मुलगी इयत्ता ५ वी व लहान मुलगी इयता ३ री मध्ये शिक्षण घेत आहे. समाजामध्ये वावरताना विशेष मान मिळण्यास सुरवात झाली.

लोक आपुलकीने विचारपूस करत असल्याने मनाला समाधान मिळू होते. याचवेळेस नवीन व्यवसाय सुरु करण्याचे विचार मनामध्ये घोळत होते, श्री मिरीकरसरांबरोबर याबाबत सविस्तर चर्चा  केली असता ड्रेस कटिंग व रेडीमेड ड्रेस विक्रीचा व्यवसाय सुरु करावा हे निश्चित झाले आणि ट्रेनिंगसाठी जवळच्या  ठिकाणाची शोधा शोध चालू केली या कामी श्री.कोरडे व श्री विनोद काटलाम यांनी मदत केली. साधारणपणे१० कि.मि.अंतरावर ट्रेनिंगच्या जागेची निवड करून ट्रेनिंगला सुरुवात झाली. हि सर्व प्रक्रिया चालू असताना पूर्वीचे घेतलेले कर्ज रुपये९०००/- ची पूर्णपणे परतफेड जुलै २०१५ केली.कोरडेकडे नवीन कर्जासाठी रुपये २००००/- मागणी केली,श्री मिरीकरसरांबरोबर सविस्तर चर्चा केल्यानंतर सप्टेंबर मध्ये रुपये  १५०००/- कर्ज मिळाले आणि नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी नव्याने सज्ज झाले.

यश कधी एका रात्रीतून मिळत नाही. त्यासाठी परिश्रमांची श्रुंखला गुंफावी लागते. ‘उंटावर बसून शेळ्या हाकण्यातून’ काहीच साध्य होत नाही. तर त्याकरिता स्वत: कष्ट करून आयुष्य घडवावे लागते.माणसाच्या जीवनात सुख-दु:खाचा लपंडाव सतत चालूअसतो. तथापि अपयशाने कधीही  खचून न जाता, दंड थोपटून जो मुकाबलाकरतो,त्याच्याच गळ्यात यश पडत असते हे ध्यानात घेऊनमाणसाने सतत सकारात्मक दृष्टी ठेवून प्रयत्नशील राहायला हवे.

या ठिकाणी आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोनच बदलुन गेला आणि खरोखरच जगण्याचा नवीन मार्ग मिळाला.आत्मविश्वास, धैर्य, चिकाटीला जगातील कुठलीच गोष्ट हिरावून घेऊ शकत नाही. जे काही करण्याचा तुम्ही निर्णय घ्याल, त्याची धाडसाने अंमलबजावणी करा. तुम्हाला माहीतच असेल की, धाडसामध्ये शक्ती आहे. धाडसामध्ये जादू आहे. मला एवढंच सांगावसं वाटतं की, तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्हाला आधी जास्त द्यावं लागेल. आणि हो.. नेहमी मोठमोठी स्वप्ने पाहा. कारण मोठ्या स्वप्नांमुळे आपल्यामध्ये महत्त्वाकांक्षा, चिकाटी येते.

माझ्या यशामध्ये WOTR हि संस्था तसेचWOTR चे अधिकारी याचा बहुमोल वाटा आहे या सर्वांचे मन:पूर्वक आभार!!!!

धन्यवाद.

 

वसंत कोरडे

उपजीविका अधिकारी

संपदा ट्रस्ट, अहमदनगर

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate