सगळयांनी मिळेनि वागावे l
सर्वाचे समजोनि कार्य करावे l
श्रीमंत-गरीब दिसोचि न द्यावे l
बहिरंग जीवनी ll
असे राष्ट्रासंत तुकडोजी महाराजांनी आपल्या" ग्रामगीतेत " गरिबी- श्रीमंती " या सतराव्या अध्यायात म्हटले आहे. ही दरी बुजवण्याचे काम शासन " सुवर्ण जयंती राजस्व अभियान " या नव्या ग्रामगीतेद्वारे करीत आहे. एकत्रित व एकोप्या ने काम केले तर गावाचे रुपडं बदलू शकते, यासाठी हवी प्रबळ इच्छाशक्ती . आता शासन व प्रशासनाने मनावर घेतले आहे. महसूल खात्याने विशेषतः गावातील दाखले असोत, बंद रस्ते मोकळे करणे, सर्व सुविधा इंटरनेटवर उपलब्ध करण्याचे काम प्रशासन गतीने आज करीत असल्याचे दिसत आहे. हेच काम अखंड चालू राहिले तर गरीब-श्रीमंतातील भेदाभेद नाहीसा होण्यास कितीसा काळ लागेल. फक्त मनाने उचल खाल्ली पाहिजे, तरच साध्य !
अगदी अकोल्यासारख्या आदिवासी तालुक्याचेच पहा, सहयाद्रीच्या डोंगर रांगात दिमाखाने उभा असलेला हा तालुका, आता या तालुक्याचे भाग्य अधिक उजळणार आहे. राजस्व अभियानच्या मदतीनं, तालुक्याच्या स्थळापासून साठ किलोमीटर अंतरावर पेढेवाडी हे गाव अतिशय दुर्गम भागात वसलेलं. लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास लोकशाही प्रजासत्ताकात विकासाची किरणं या गावात अभियानाच्या माध्य्मातून दिसू लागली. तहसीलदार माणिक आहेर यांनी आपला एक दिवस या गावासाठी दिला, केवळ दाखले वाटपासाठी , नवा इतिहाच त्यांनी घडवला. अगदी लहान मुलापासून ते शंभरीकडे झुकलेल्या वृध्दापर्यत प्रत्येक नागरिकास जातीचे दाखले देण्यात आले. जातीचे बाराशे दाखले या एकटया गावात वितरित करण्यात आले. तालुक्यातील हे पहिलेच दाखला मुक्त गांव. शेती व मजुरी यावरच लोकांची उपजीविका अवलंबून आहे. लोकांच्या चेह-यावर जातीचे दाखले मिळाल्याचा वेगळाच आनंद होता.
जातीचे दाखले घरपोच देऊन " शासन आपल्याच दारी " या घोषणेचा ख-या अर्थाने अंमल झाला. आदिवासींच्या जीवनात गोड व सुखद पहाटच उजाडली. आगामी पंचवीस वर्षात या पाडयावरील आदिवासीना जाती दाखल्यासाठी तालुक्याच्या गावी जावे लागणार नाही, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. महसूल प्रशासनाचे त्यांनी आभारही मानले. राजस्व अभियान नेकीने राबविले गेले तर गावाचे बहिरंग खरेच बदलणार आहे. सर्वाना समान न्याय दिला गेल्यास भेदाभेदही कमी होण्यास मदत होईल. ग्रामस्थ सहकार्यास तयार आहेत. आपलेच कार्य आहे असे समजून काम केले तर आदिवासींच्या जीवनातही विकाससूर्य कोसो दूर नाही हेच दिसेल.
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020
रोमन साम्राज्याच्या काळापासून ज्यू लोकांचे स्वतंत...
एखाद्या संस्थेच्या मान्य सभासदांकडून त्या संस्थेच्...
आधुनिक काळात सर्व सामाजिक, राजकीय व स्थानिक स्वराज...
महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी सुवर्ण जयंती ...