कोंबडीखताचा वापर कसा करावा..
- मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडीखत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी; मात्र ताजे कोंबडीखत उभ्या पिकात जमिनीत मिसळू नये.
- उभ्या पिकात कोंबडीखत जमिनीत मिसळण्यापूर्वी प्रथम त्यावर एक महिना पाणी मारून रापून किंवा थंड होऊ द्यावे म्हणजे कोंबडीखताचे कर्ब : नत्र गुणोत्तर कमी होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. कोंबड्यांच्या शेडमध्ये कोंबड्यांची विष्ठा, मूत्र, गव्हांडा किंवा भाताच्या तुसावर पडून खत तयार होते, त्यामुळे ताज्या कोंबडीखताचे कर्ब : नत्र गुणोत्तर जास्त असते. असे खत उभ्या पिकात जमिनीत मिसळताना ओलावा असला पाहिजे. जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर पीक पिवळे पडते, त्यामुळे ताजे कोंबडीखत थेट पिकांसाठी वापरू नये.
- उभ्या पिकात पूर्ण कुजलेले कोंबडीखत वापरावे. हलक्या, जास्त निचऱ्याच्या, लालसर तांबड्या जमिनीत कोंबडीखतातील नत्र, स्फुरद, पालाश अन्नद्रव्यांव्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व सोडिअमचे प्रमाण जमिनीत मिसळले जाऊन पिकांना उपलब्ध होतात.
- जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. शेणखतासारखा तणांचा प्रादुर्भाव कोंबडीखतातून होत नाही.
संपर्क - 02426- 243209
मृदशास्त्र व कृषी रसायनशास्त्र विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.