অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखावी...

अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखावी...

1) नत्र - झाडांची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.

2) स्फुरद - पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानांची मागची बाजू जांभळट होते.

3) पालाश - पानांच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

4) जस्त - पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो. पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.

5) लोह - शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ खुंटते.

6) तांबे - पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.

7) बोरॉन - टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने मरतात.

8) मॉलिब्डेनम - पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात. पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.

9) गंधक - झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात.


संपर्क - 0724 - 2258217. विस्तार - 1067 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate