सध्या डिजिटल उपकरणाचा वापर प्रचंड वाढत असला तरी त्याची बॅटरी संपण्याची समस्या वाढत आहे. त्यावर टोरोंटो विद्यापीठातील उपयोजित शास्त्र आणि अभियांत्रिकी विभागातील संशोधकांनी उपाय शोधला असून, प्रकाश संवेदक घटकांची (कोलायडल क्वांटम डॉटस) फवारणी कोणत्याही पृष्ठभागावर केल्यानंतर त्यातून सौरऊर्जा मिळविता येणार आहे. हे सोलर पॅनेल अत्यंत स्वस्त पडतील.
टोरोंटो विद्यापीठातील क्रामर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फवारणीद्वारा प्रकाश संवेदक घटकांचा वापर करण्याची नवी पद्धती शोधली आहे. लवचिक पातळ फिल्मवर प्रकाश संवेदक घटकांचे आवरण फर्निचरपासून विमानाच्या पंखापर्यंत कोणत्याही उपकरणाला देता येईल. या प्रणालीला स्प्रे एलडी असे नाव देण्यात आले. त्यामध्ये एक अणूच्या जाडीएवढा थर देण्यात येतो. साधारण कारच्या आकाराच्या आवरणातून तीन 100 वॉट दिवे किंवा 24 सीएफएल इतकी ऊर्जा मिळू शकेल. या बाबत दोन संशोधने "जर्नल ऍडव्हान्सड मटेरिअल्स' आणि "ऍप्लाईड फिजिक्स लेटर्स'मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. तिसऱ्या संशोधनामध्ये आयबीएम कंपनीच्या ब्लूजीन क्यू या सुपर कॉम्प्युटरच्या साह्याने क्रामर आणि सहकाऱ्यांनी फवारणीद्वारा कोलायडल क्वांटम डॉटस च्या कार्यक्षमतेचा अभ्यास केला. त्याचे निष्कर्ष "एसीएस नॅनो' या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित केले आहेत.
"क्वाटंम डॉट सोलर टेक्नॉलॉजी' मध्ये सातत्याने सुधारणा होत आहेत. या सौलर सेलची कार्यक्षमता वाढत असताना, खर्चामध्ये बचत होत आहे. त्या विषयी माहिती देताना प्रा. टेड सार्जंट सांगितले, की फवारणीद्वारा अत्यंत पातळ अशा प्रकाश संवेदक घटकांचा थर देणे शक्य झाल्यामुळे कोणत्याही पृष्ठभागावरून सौरऊर्जा मिळविणे शक्य होणार आहे, तसेच याचे नियंत्रण, शुद्धता हे अत्यंत सुलभ होणार आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात कीटकनाशके खरेदी करतांना आणि वापरतांना स...
पेरणीपासून ते उगवणीपर्यंत पिकांवर विविध प्रकारच्या...
ही कृषि उत्पादन पद्धतीमधील प्रमुख जैविक अडथळा आहेत...
संत्र्याच्या जुन्या झांडाचे (१५ वर्षे क्यापेक्षा ज...